Accident
Accident Accident
छत्रपती संभाजीनगर

'हायवा'च्या धडकेत महिला ठार, औरंगाबाद-फुलंब्री मार्गावर घटना

नवनाथ इधाटे

‌जखमी अवस्थेत औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून प्रीती पाटील यांना मृत घोषित केले.

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : हायवा ट्रकच्या धडकेत स्कुटीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२७) फुलंब्री Phulambri - औरंगाबाद Aurangabad रस्त्यावर सावंगीनजीक असलेल्या निजीवूड सीड्स कंपनीच्या परिसरात घडली. या अपघातात एक महिला जखमी झाली असून या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रीती पाटील (वय ३५) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून अन्य जखमी महिलेचे नाव कळू शकले नाही. याबाबत पोलिसांनी सांगितले की, स्कुटीवरुन (एमएच २० डीपी ६७३०) दोन महिला औरंगाबादहून फुलंब्रीकडे रविवारी दुपारी जात होत्या. यावेळी स्कुटीला समोरुन येणाऱ्या हायवा ट्रकने (एम.एच २०डीई ७५५०) जोरात धडक दिली. यात स्कुटीवरील सदर महिला हायवाच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाल्या. ‌जखमी अवस्थेत औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात Ghati Hospital दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून प्रीती पाटील यांना मृत घोषित केले.aurangabad accident news woman died near phulambri

तर दुसरी महिला जखमी असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस हेडकॉन्स्टेबल ए. डी. पाचंगे यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त वाहने फुलंब्री पोलिस ठाण्यात Phulambri Police Station जमा केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक मुगद्दीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पांचगे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT