Aurangabad Accident News Sonu Magare 
छत्रपती संभाजीनगर

वाहनाने दिली हुलकावणी अन् एकुलता एक मुलगा गेला आईवडिलांना अवेळी सोडून

शेख मुनाफ

आडुळ (जि.औरंगाबा) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला हुल दिल्याने दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) बायपासवर रविवारी (ता.२८) रात्री आठच्या सुमारास घडली. सोनु महादव मगरे (वय २०, राहणार चिकलठाणा) , गणेश अशोक मगरे (वय २०, राहणार औरंगाबाद), करण श्रीराम नरवडे (वय २३, राहणार ब्रीजवाडी) हे रविवारी रात्री दुचाकीने (एमएच २० एफजी ५८०४) रजापुरकडुन औरंगाबादकडे जात होते.

दुचाकी आडुळ शिवारातील बायपासवर दुचाकी येताच त्याच दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला हुल दिली. त्यामुळे दुचाकी स्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरल्याने दुचाकीवरील तिघे जण खाली पडले. यात सोनु मगरे हा जागी ठार झाला, तर गणेश मगरे व करण नरवडे गंभीर जखमी झाले आहे. सोनू हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

अपघाताची माहिती मिळताच १०२३ रुग्णवाहिकेचे चालक गणेश चेडे, डॉ. विजय धारकर, विठ्ठल गायकवाड यांनी जखमीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असुन पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस करित आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT