छत्रपती संभाजीनगर

पुणे-औरंगाबाद महामार्गावर अंगावरुन ट्रक गेल्याने युवकाचा दुर्दैवी अंत

पोलिसांनी ट्रक व चालकाला ताब्यात घेऊन ट्रक पोलिस ठाण्यात जमा केला असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमील पठाण

कायगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-पुणे महामार्गावरील (Pune-Aurangabad Highway) जुने कायगाव (ता.गंगापूर) येथे ट्रक चालकाने मोटरसायकलला पाठीमागुन उडवल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.एक) दुपारी पावणे एकच्या दरम्यान घडली. गंगापूर पोलिसांकडून (Gangapur Police Station) मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद-पुणे महामार्गावरील कायगाव टोका येथील जिल्हा तपासणी नाक्याजवळ औरंगाबादहून अहमदनगरकडे (Ahmednagar) गणेश रोड लाईन कंपनीचा बारा टायरचा ट्रक (एमएच १६ सीसी ७४६७) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवुन जामगाव येथुन प्रवरासंगमकडे शाईन मोटारसायकलवर बसुन जात असलेल्या प्रदीप कैलास मगर (वय २३) याला पाठीमागून धडक दिली. (Aurangabad Accident News Youth Dies In Road Accident)

या धडकेत मोटारसायकल विरुद्ध दिशेला पडली, तर प्रदीप हा. टायरच्या खाली सापडला त्याच्या पोटावरून चाक गेल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाला.तपासणी नाक्यावर असलेल्या पोलिस पोलिस नाईक संदीप डमाळे, राहुल वडमारे, गृहरक्षक रामेश्वर मंडलीक आदींनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. पोलिसांनी ट्रक व चालकाला ताब्यात घेऊन ट्रक पोलिस ठाण्यात जमा केला असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक औटे हे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT