Aurangabad Accident
Aurangabad Accident esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad|औरंगाबादेत वर्‍हाडाची बस घाटात कोसळून १ ठार,१० गंभीर जखमी

संतोष शेळके

करमाड (जि.औरंगाबाद) : लग्न समारंभ आटोपून नवरदेवाच्या गावाकडे परतताना गावाजवळील घाटावर बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस घाटात कोसळून एक जण ठार, तर प्राथमिक माहितीनुसार दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आडगाव सरक (ता.औरंगाबाद) येथील घाटात सोमवारी (ता.१३) सायंकाळी (Aurangabad) साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेत नवरदेवाचे नातेवाईक असलेले भगवान शेनफड बोबडे (वय ३८, रा. जातेगाव, ता. फुलंब्री) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार दहा जण गंभीर जखमी, तर काही जण किरकोळ जखमी (Accident In Aurangabad) झाले आहेत. अपघातात ही बस सुमारे वीस फुट खोली असलेल्या दरीत कोसळल्यावरून या अपघाताचा अंदाज येऊ शकतो. (Aurangabad Accident One Died, 10 Serious Injured In Bus Accident)

क्षणात घडलेल्या अपघातानंतर घटनास्थळी फक्त आक्रोशच :

या अपघाताची अधिक माहिती अशी की, आडगाव सरक येथील पठाडे कुटुंबातील मुलाचे औरंगाबाद तालुक्यातीलच पांढरी पिंपळगाव येथील ठोंबरे कुटुंबातील मुलीशी सोमवारी (ता.१३) दुपारी लग्न समारंभ होता. यासाठी आडगाव सरक येथून (एमएच 20 डब्ल्यू 9358) बसने वर्‍हाडी पांढरी पिंपळगाव येथे आले होते. दुपारी अडीचच्या सुमारास अगदी आनंदात व शांततेत विवाह समारंभ ही पार पडला. सर्व विधीही पार पडले. त्यानंतर साडेचारच्या सुमारास वर्‍हाडास घेऊन ही बस पुन्हा आडगाव सरककडे रवाना झाली. दरम्यान, साडेपाचच्या सुमारास ही बस आडगावचा घाट उतरत असताना अचानक बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. क्षणार्धात बस सुमारे वीस फुट खोलीच्या दरीत जाऊन पलट्या घेत कोसळली. यावेळी बसमध्ये बसलेल्यांना अपघाताचा अंदाज येईपर्यंत बस दरीत कोसळली होती. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजामुळे शेतातुन घरी परतणार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत मोठी मदत केली. घटनास्थळापासुन गावसुध्दा जवळ होते.

त्यामुळे काही क्षणातच घटनास्थळी हजारोंची गर्दी झाली होती. घटनेची माहिती करमाड पोलिसांना मिळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, सहायक पोलीस निरीक्षक पाटील, बीट जमादार सोनवणे व इतरांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेऊन या रस्त्यावरील वाहतुक सुरळीत केली. ग्रामस्थांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारेे काही गंभीर जखमी झालेल्यांमध्ये आडगाव सरक येथीलच रामदास पठाडे, गिताबाई पठाडे, अंजना पठाडे,अनिता पठाडे, काशीनाथ पठाडे, नंदु पठाडे यांचा समावेश आहे. बर्‍याच जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. गंभीर जखमींना औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयासह इतर विविध खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनास्थळी ग्रामस्थ राजकीय मंडळींच्या भुमिकेविरूध्द आक्रमक :

आडगाव सरकच्या या घाटावरील रस्ता अंत्यंत अरुंद आहे. यापुर्वीही या ठिकाणी कित्येक किरकोळ अपघात झालेले आहेत. मात्र, प्रशासन व राजकीय मंडळींनी ठोस भुमिका न घेतल्याने या घाटाचा व रस्त्याचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. आता या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधी मंजुर आहे. परंतु वन विभागाच्या हद्दीत हा रस्ता येत असल्याने वनविभागाची याला हरकत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अपघातानंतर अनेक राजकीय मंडळींनी आडगाव सरककडे धाव घेतल्याचे समजले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT