Aurangabad Bajaj Auto Ltd Will Expand Soon After The Recession- Madhur Bajaj 
छत्रपती संभाजीनगर

मंदी संपताच बजाज ऑटोचा होणार विस्तार

प्रकाश बनकर

औरंगाबाद: ""सध्या ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रात मंदीचे सावट आहे. यातून हे क्षेत्र सावरत अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मंदीचे हे चित्र बदलताच औरंगाबादेत बजाज ऑटोचा विस्तार करण्यात येईल,'' अशी घोषणा बजाज ऑटोचे उपाध्यक्ष मधुर बजाज यांनी रविवारी (ता.16) केली. 

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रिकल्चरच्या (सीएमआयए) इमारतीच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन श्री. बजाज यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 
कार्यक्रमाला सीएमआयएचे अध्यक्ष गिरिधर संगनेरिया, सी. पी. त्रिपाठी, उल्हास गवळी, रवी मांचर, सचिव शिवप्रसाद जाजू, सहसचिव सतीश लोणीकर, सीएमआयए कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. सुनील देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. बजाज म्हणाले, ""आयुष्याचे दहा वर्षे या शहराला दिले. त्यामुळे शहराविषयी नेहमीच वेगळे आकर्षण राहिले. औरंगाबादेत बजाज ऑटो आल्यानंतर जवळपास शंभर कंपन्या त्यावेळी सुरू झाल्या. पूर्वीचे औरंगाबाद गाव आज शहर झाले. औद्योगिक वसाहतीसह शहर वाढले आहे. याचे सर्व श्रेय हे उद्योजकांनाच जाते.

शहरातील सामाजिक प्रकल्पास सीएआरच्या माध्यमातून मदत करण्यास तयार राहू. यासह सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटी रुपये दिले जाणार आहेत,'' असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बजाज यांनी मॅजिक सेंटरला भेट दिली. यासह योगेश गावंडे या विद्यार्थ्याने तयार केलेल्या फवारणी यंत्राची पाहणी करीत याविषयी शासनाकडे सबसिडीसाठी पाठपुरावा करण्याची सूचना केली. कार्यक्रमास सीएमआयएचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, मिलिंद कंक, गुरुप्रीतसिंग बग्गा, कॅप्टन पीयूष सिन्हा, प्रसाद कोकीळ, समिती सदस्य दुष्यंत पाटील, अजित मुळे, नितीन गुप्ता, उत्सव मांचर, मुकुंद बडवे, ऋषिकेश गवळी, प्रतीश चॅटर्जी, दिलीप जंगले, कमल राव, विश्‍वनाथन यांची उपस्थिती होती. 

    शहराचा विकास आराखडा तयार करा 
""शहराच्या औद्योगिक प्रगतीत बजाज ऑटो लिमिटेड आल्यामुळे खऱ्या अर्थाने औद्योगिकीकरणास सुरवात झाली. यातून सध्या शेंद्रासारखी पंचतारांकित औद्योगिक वसाहत सुरू झाली. शेंद्राचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, आता दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यामुळे भविष्याचा वेध घेत औरंगाबाद शहराचा पाच, दहा आणि पन्नास वर्षांचा विकास आराखडा सीएमआयने तयार करावा. तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न करावेत, अशा सूचनाही बजाज यांनी यावेळी केली.

पाण्यासाठी पुढाकार घेणार 
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्याची बिकट समस्या आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बजाज ऑटो उद्योगाने मोठे काम हाती घेतले आहे. यात शंभरहून अधिक गावांचा समावेश आहे. बहुतेक ठिकाणी काम प्रगतिपथावर आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

FDA Action: 'सुलेमान मिठाईवाला'वर बडगा! मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने एफडीएकडून निलंबित

Asian Games 2026 : भारतीय नौकानयनपटू 'संपावर' जाण्याच्या तयारीत! जपानमध्ये खेळाडूंकडून बंडाची भूमिका; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : गंगाखेड तालुक्यात गांजाची लागवड, ७६.९६ लाखांचा माल जप्त

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

SCROLL FOR NEXT