Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

सत्तेत असताना चंद्रकांत पाटलांनी म्हशी भादरल्या का... 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा मुद्दा चंद्रकांत पाटलांना आत्ता आठवला का? सत्तेत असताना पाच वर्ष त्यांनी काय म्हशी भादरल्या का, असा सवाल कांग्रेसचे शहराध्यक्ष माजी आमदार नामदेवराव पवार यांनी केला आहे. 

कांग्रेस पक्षाच्या वतीने आरक्षण वाचवा अभियानाला औरंगाबादमधून रविवारी (ता. १) सुरूवात झाली. या अभियानात मराठवाड्यात गावोगावी जाऊन जागृती करण्यात येणार आहे. यावेळी नामदेव पवार यांनी भाजपवर टीका केली. 

''औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हायलाच हवे. आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे वंशज आहोत, आपण औरंगजेबाचे वंशज नाहीत, त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करून नाव बदलायला हवे,'' असा सूचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला होता. 

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी (ता. २९) औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शहरातील उद्योजक, व्यापारी, वकील, सीए, डॉक्टर व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी हॉटेलमध्ये संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्याला आज कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांनी प्रत्युत्तर दिले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT