Subhash Desai Sakal
छत्रपती संभाजीनगर

उद्योगमंत्री देसाईंना उच्च न्यायालयाचा दणका, प्लॉटचा ताबा घेण्यास अंतरिम मनाई

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना पदाधिकारी शशिकांत वडळे यांना विनानिविदा शेंद्रा आौद्योगिक वसाहतीतील प्लॉट मंजूर केला होता.

अनिल जमधडे

औरंगाबाद : राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना पदाधिकारी शशिकांत वडळे यांना विनानिविदा शेंद्रा आौद्योगिक वसाहतीतील प्लॉट मंजूर केला होता. त्यांच्या एस. एस. वैशाली इंडिया लि. या कंपनीच्या न्यायप्रविष्ट प्रक्रियेत प्लॉटसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे (Aurangabad Bench Of Bombay High Court) न्या. आर. डी. धानुका व न्या. एस. जी. मेहरे यांनी चार एप्रिलला सुनावणी ठेवली आहे. तोपर्यंत संबंधित प्लॉटचा ताबा वैशाली कंपनीकडून एमआयडीसी प्रशासनाने घेऊ नये असे स्पष्ट केले आहे. एस. एस. वैशाली इंडिया लि. कंपनीला शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील (Shendra MIDC) प्लॉट क्र. ए-२ मंजूर झालेला आहे. अजित अंबादास मेटे आणि अंबादास विश्वनाथ मेटे कंपनीचे संचालक आहेत. यांनी संबंधित प्लॉटवर उद्योग उभारला. त्यानंतर त्यास २०१९ मध्ये आग लागली. या संबंधी भरपाईचा दावा दाखल केलेला आहे. (Aurangabad Bench Of Bombay High Court Order Interim Stay On Industry Minister Desai's Plot Allocation)

एमआयडीसी प्रशासनाने संबंधित कंपनीने प्लॉटचे बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घेतले नसल्यामुळे त्यांना दोन वेळा नोटीस बजावली. प्रक्रिया सुरू असताना २०१९ मध्ये प्लॉट रद्द केला. यासंबंधीच्या निर्णयास न्यायालयात आव्हान देण्यात आले असून याचिका प्रलंबित आहे. दरम्यान शिवसेना पदाधिकारी असलेले शशिकांत वडळे यांनी वैशाली कंपनीचा प्लॉट आपणास मिळावा म्हणून त्यांनी उद्योगमंत्री देसाईंकडे अर्ज केला. वडळे यांची कंपनी अस्तित्वात नसून त्यांनी नियोजित कंपनीसाठी अर्ज केला. यासंबंधी खासदार विनायक राऊत यांनीही उद्योगमंत्री यांच्याकडे वडळे यांना भूखंड देण्याची विनंती केली.

मात्र निविदा मागवून प्लॉटची विक्री करणे हे एमआयडीसीचे धोरण आहे. यासंबंधीची ई-टेंडरिंग प्रक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी थांबविली. कुठल्याही प्रक्रियेचा अवलंब न करता भूखंड वडळे यांना मंजूर केला. संबंधित प्लॉटवर वैशाली कंपनीचा ताबा असल्याने एमआयडीसी यावर ताबा घेण्यासाठी ११ मार्च २०२२ रोजी पोलिस अधीक्षक ग्रामीण यांच्याकडे पोलिस संरक्षण मिळविण्यासाठी अर्ज केला. याविरोधात वैशाली कंपनीतर्फे अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

Monsoon Cough & Cold: पावसाळ्यातल्या सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम हवाय? मग लगेच करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

FDA Raid: एफडीएच्या छाप्यात मोठा खुलासा! नागपुरात गर्भपाताच्या औषधांचा बेकायदा साठा जप्त; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री..

SCROLL FOR NEXT