manisha pachod  
छत्रपती संभाजीनगर

२१ वर्षीय तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद झाल्याने घरी आली होती

हबीबखान पठाण

पाचोड (औरंगाबाद): बी.एस्सी ऍग्रीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या पाचोड खुर्द (ता.पैठण) येथील एकविस वर्षीय तरुणीने गावालगत असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.२६) पहाटे चार वाजेच्या सुमारास पाचोड खुर्द (ता. पैठण) येथे घडली असून मनिषा शिवाजी वाघ असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही.

मनिषा वाघ (वय २१) ही तीन वर्षापासून बीड येथील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. ऍग्रीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. ती खुप हुशार व शांत स्वभावाची असल्याने तिच्या आई - वडीलांसह काका तिला शिक्षण दिले. शिकण्याची इच्छा असल्याने कोणतीही अडचण न दाखविता स्वतः दुसऱ्यांकडे रोजंदारी करुन तिला पैसे पुरवून तिचे शिक्षण चालु ठेवले. मनीषाचे वडील टॅक्सीचालक असून बिकट परिस्थितीतही त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू ठेवले. परंतु यंदा कोरोनामुळे शिक्षण कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन सुरू असल्याने काही अंशी गोंधळली होती. बीड शहरात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने तेथील जिल्हाप्रशासनाकडून दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने ती चार दिवसापूर्वीच गावी पाचोडला आई वडीलांकडे आली होती.

गुरूवारी(ता.२५) रात्री कुंटुबातील सर्व सदस्यजेवण वैगरे करून झोपी गेले होते. परंतु पहाटे मनीषा घरात न दिसल्याने आई -वडीलाने एवढया रात्री ती कोठे गेली म्हणून तिचा शोध घेतला. परंतु ती आजुबाजूला दिसून आली नाही. कुंटूबियासह ग्रामस्थ व अन्य नातेवाईकांनी तिचा शोध सुरु ठेवला. पहाटे गावालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या पडित विहिरीकडे जाऊन पाहिले असता मनीषाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याने दिसून आले, उपस्थितानी तातडीने या घटनेची माहीती पाचोड पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, जमादार किशोर शिंदे, सुधाकर मोहीते आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांच्या मदतीने मनीषाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात येऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा खरात यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुधाकर मोहीते करत आहेत. अद्यापपर्यंत मनीषाच्या आत्महत्येविषयीचे कारण समजु शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WORLD CUP : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, वर्ल्ड कपच्या संघात करावे लागले दोन बदल; पॅट कमिन्सची माघार, तर...

Palghar News: रील्स करत ठाकरे बंधूंना शिवीगाळ, कार्यकर्ते आक्रमक, तरुणाला भररस्त्यात अर्धनग्न करून...; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवड शहराला अजित नगर असं नाव द्या, जालन्यात मराठा महासंघाची मागणी

झी मराठीचा ओरिजिनल खलनायक इज बॅक! तारिणी' मध्ये होणार नवी एंट्री; प्रोमो पाहून प्रेक्षकांनी ओळखलंच

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाच्या आणखी जवळ; गटनेता निवड अन् शपथेपूर्वीच खासदारकी सोडली

SCROLL FOR NEXT