valuj crime
valuj crime 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये विदेशी मद्यासह चार लाख रुपयांचा ऐवज जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद): गोवा राज्यातून विनापरवाना व बेकायदेशीररित्या वाहतूक करीत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडून विदेशी मद्य व पिकअप वाहन असा जवळजवळ चार लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी (ता.3) रोजी बिडकीन पैठण रोड परिसरात केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक हे त्यांच्या जवानासह गस्त घालत असताना त्यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, धम्मा भिमा वक्ते व गणेश अच्युतराव लघाने रा. पाचेगाव ता. गेवराई जि. बीड हे दोघे महिंद्रा पिकअप वाहन (एम एच 17 के- 9762) मधून गोवा राज्यात विक्रीकरिता असलेला विदेशी मद्य साठा बेकायदेशीरपणे बाळगून बिडकीन औरंगाबाद दिशेने वाहतूक करणार आहे. या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शरद फटांगडे यांनी पथकासह पैठण रोडवर सापळा रचून महिंद्रा पिकअप जीप (एम एच 17 के- 9762) आडवली.व  धम्मा भीमा वक्ते व गणेश अच्युतराव लघाने यांच्यासह जीपची झडती घेतली असता जीपमध्ये एक फूट उंचीचा लोखंडी पत्रा टाकून कृत्रिम रीत्या तयार करण्यात आलेल्या कप्प्यात मॅकडॉल नंबर वन व्हिस्की 180ml च्या 1 हजार 152 बाटल्या मिळून आल्या.

जीपसह विदेशी मद्य मिळून अंदाजे 3 लाख 94 हजार 220 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला मद्यसाठा गोवा राज्यात निर्मित व फक्त गोवा राज्यात विक्री करिताच तसेच गोवा राज्यात महसूल जमा केलेला असल्याचे निष्पन्न झाले. हा मद्यसाठा बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात आयात झाल्याने महाराष्ट्र शासनाचा मोठ्या प्रमाणात उत्पादन शुल्क महसूल बुडाला आहे. या प्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा 1948 चे जामीनपात्र कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच हा मद्यसाठा पाचेगाव ता. गेवराई जि. बीड येथील रामेश्वर बळीराम हातोटे या सराईत गुन्हेगाराच्या मालकीचा असल्याचे व तो या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे विभागीय उपायुक्त औरंगाबादचे प्रदीप पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांना संपर्क साधून आरोपी हातोटेला ताब्यात घेण्याचे सूचना केल्या.  ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय आयुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद फटांगडे यांच्या पथकाने 
 केली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक विजयकुभार आगळे, शरद रोटे, विजय मकरंद, अमोल अन्नदाते, राजू अंभोरे, हर्षल बारी व नवनाथ घुगे यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT