Vaijapur Gas Explosion News  
छत्रपती संभाजीनगर

वैजापूर तालुक्यात गॅसचा स्फोट होऊन संसारोपयोगी साहित्य जळून खाक, महिला होरपळून जखमी 

रमेश राऊत

शिऊर (जि.औरंगाबाद) : निमगाव (ता.वैजापुर) येथील अण्णासाहेब येडू गायकवाड यांच्या घरातील गॅसचा स्फोट होऊन त्यात त्यांची आई चंद्रकलाबाई येडूबा गायकवाड (वय ६५ ) या होरपळून जखमी झाल्या आहेत. गायकवाड कुटुंबीय हे निमगाव शिवारातील शेत गट क्रमांक ८७ या शेतवस्तीवर राहतात. नेहमी प्रमाणे सोमवारी (ता.पाच) रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास स्वयंपाक करून शेजारील वस्तीवर गेले असता थोड्याच वेळात अचानक गॅस टाकीचा स्फोट होऊन परिसरात मोठा आवाज झाला. या घटनेत पत्र्याचे घर जळाले.

घरातील सोनेचांदीचे दागिने, रोख चाळीस हजार रुपये दहा क्विंटल गहु, आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, संसारोपयोगी साहित्य मिळुन दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. घरात बांधलेली शेळी होरपळून ठार झाली. चंद्रकलाबाई या बकरी सोडण्याच्या प्रयत्नात असतांना त्याही जखमी झाल्या असून सदर महिलेस औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती पोलिस पाटील शिवाजी सीताराम गायकवाड यांनी तलाठी युसूफ पठाण यांना कळविली. त्यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. 

संपादन - गणेश पिटेकर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union History : ‘गोकुळ’ची स्थापना कधी झाली? आतापर्यंत किती अध्यक्ष झाले; पहिल्यांदाच चंदगडला अध्यक्षपदाचा मान, पाहा संपूर्ण यादी

Pune Fire: फटाक्याने लागलेल्या आगीत गुरुवार पेठेतील जुना वाडा जळून खाक; कोथरूडमध्ये धावत्या कारने घेतला पेट

'लाज वाटली पाहिजे!' सीतेच्या अ‍ॅक्शन अवतारावर मुकेश खन्ना संतापले; दीपिका चिखलिया यांनीही उपस्थित केले सवाल

Latest Marathi News Live Update : वनमंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्याला आग

शो ऑफ करायला गेला आणि तोंडावर पडला... वर्षा उसगावकर यांनी सांगितलं अक्षय कुमारचा तो किस्सा; म्हणाल्या- त्याला वाटत होतं...

SCROLL FOR NEXT