Traders Association Oppose Lock Down 
छत्रपती संभाजीनगर

'पूर्णपणे लॉकडाऊनला पाठिंबा, मात्र इतरांना सूट दिल्यास उद्यापासून दुकाने उघडणार'

प्रकाश बनकर

औरंगाबाद : राज्यात कडकडीत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला, तर त्यास पाठिंबा देऊ. पण लॉकडॉऊनमध्ये काही व्यवसायाला सूट दिल्यास. मात्र आम्ही सोमवारपासून (ता.१२) दुकाने सुरू करू, असा इशारा महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ॲग्रीकल्चरच्या शनिवारी (ता.दहा) झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली. या बैठकीत राज्यभरातील सर्व संघटनांनी सहभाग नोंदवला होता. जगन्नाथ काळे म्हणाले की, या बैठकीला मी छोट्या व्यापाऱ्यांना मदत मिळवून देणे हा मुद्दा मांडला. सध्या छोटे व्यापारी फारच अडचणीत आहे.

त्यांना पॅकेज मिळवून हा उद्देश आहे. स्वातंत्र्य काळापासून आतापर्यंत छोट्या व्यापाराला कुठलीच मदत मिळालेली नाही. त्यामुळे या मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे या बैठकीत मुद्दा माडला. यासह स्थानिक प्रशासनाला बाजारपेठा सुरू व बंद ठेवण्याचा अधिकार द्यावा, रुग्णसंख्येच्या वाढीनुसार स्थानिक प्रशासन म्हणजेच जिल्हाधिकारी निर्णय घेतील. हा मुद्दाही बरोबर असल्याचे सर्वानी सांगितले. याचं संपूर्ण लॉकडाऊन केल्यास आम्ही पाठिंबा देऊ व कोणत्याही व्यवसायाला सूट दिल्यास, मात्र आम्ही सरकारच्या निर्णयाविरोधात अस्थापना उघडू असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा व्यापारी महासंघ संलग्न असलेल्या सर्व ७२ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आज रविवारी ऑनलाईन बैठक होईल. या बैठकीत उद्या दुकाने सुरू करावे की नाही याबाबत चर्चा केली जाईल असे जगन्नाथ काळे यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंना बीडमध्येच एवढा पाठिंबा का मिळतो? गेवराईत मराठा समाजातल्या मुलींबद्दल आक्षेपार्ह विधान

Medicine MRP Change: औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार! केंद्र सरकारचा नवा आदेश लागू, अंमलबजावणी कधी करणार?

Bala Nandgaonkar : "राज ठाकरेंनी केलेली कामे तरी टिकवा!" बाळा नांदगावकरांचा भाजपला टोला

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

Credit Card Scheme: मोदी सरकार देत आहे क्रेडिट कार्ड, मर्यादा ५ लाख रुपये, 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT