Aurangabad Traders Open Shops 
छत्रपती संभाजीनगर

पोलिसांचा व्यापाऱ्यांना इशारा; दुकाने उघडाल, तर गुन्हे दाखल करु

प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्हा व्यापारी महासंघाच्या रविवारी (ता.११) रात्री उशिरा आलेल्या आदेशानुसार पैठणगेट परिसरातील काही व्यापाऱ्यांनी सोमवारी (ता.१२) सकाळी दुकाने उघडली. मात्र पोलिसांनी पुढे येत दुकाने बंद करण्याच्या सूचना केल्या. दुकाने उघडली तर गुन्हे दाखल करू अशा स्पष्ट सूचना दिल्यामुळे व्यापाऱ्यांना दुकाने बंद करावी लागली.  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऍग्रिकल्चरच्या सोबत झालेल्या बैठकीत रात्री उशिरा व्यापारी आस्थापने सुरू करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार आज सोमवारी व्यापारी महासंघाच्या सूचनेनुसार व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास सुरुवात केली होती.

मात्र क्रांती चौक पोलिस व सिटी चौक पोलिसांतर्फे त्यांच्या हद्दीतील दुकानदारांना दुकान उघडू नका. नियमांचे पालन करा जिल्हाधिकाऱ्यांनी दुकान उघडण्यासंदर्भात कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल करू, असा इशाराही पोलिसांनी दिला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी उघडलेली दुकाने पुन्हा बंद केली. दरम्यान पोलिसांनी जी दुकाने उघडली होत. त्याचे व्हिडिओ शूटिंग फोटोज घेऊन ठेवले आहेत. व्यापाऱ्यांनी पोलिसांचे ऐकले नाही, तर हाच पुरावा ग्राह्य धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

‘ब्रेक द चेन’मुळे कापड व्यवसाय संकटात, निर्बंधांमुळे लग्नसराईतील चैन संपली

गुढीपाडव्यामुळे होती आशा
मंगळवारी गुढीपाडवा आहे. त्याच पूर्वी आज व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. गेल्या महिनाभरापासून दुकाने सुरू बंद असल्यामुळे व्यापारी हैराण झाले आहेत. किमान आज तरी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर काही उलाढाल होईल. या अपेक्षेने काही व्यापाऱ्यांनी आज दुकाने उघडली होती.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Education Director Killed : पलूस हादरलं! शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; मुलाने पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात वडिलांचा मृतदेह पाहिला अन्...

ही मालिका मिळूदे म्हणून बोलले आणि... गुढी पाडव्याला गावाला जाणार आहे विजय बाबर; अभिनेत्रींनी सांगितले खास प्लॅन

Jaykumar Gore: कायदा-नियम बदलू, पण मराठा समाजाचे प्रश्न सोडवू: पालकमंत्री जयकुमार गोरे; मला बाहेरचा म्हणू शकत नाही, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT