Grocery Shop Burned Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादच्या टाकळी कोलतेमधील किराणा दुकानाला भीषण आग, सत्तर लाखांचा माल जळून खाक

बाबासाहेब ठोंबरे

पीरबावडा (जि.औरंगाबाद) : टाकळी कोलते (ता.फुलंब्री) येथे किराणा दुकानाला आग लागून सर्व सामान जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी (ता.तीन) पहाटे दोन वाजेदरम्यान घडली आहे. टाकळी कोलते येथील बसस्थानकावरच व्यापारी नितीन शांतीलाल कुंकुलोळ यांचे किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे कुंकुलोळ हे मंगळवारी (ता.दोन) रात्री नऊ वाजता दुकान बंद करून घरी गेले. मात्र बुधवारी पहाटे दोन वाजता दुकानातून अचानक धूर निघत असल्याचे दुकानाच्या पाठीमागे राहत असलेले नितीन कुंकुलोळ यांच्या लक्षात आले.

तेव्हा त्यांनी बाहेर येऊन बघितले असता दुकानाला भीषण आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी समोरच राहत असलेले माजी सरपंच विजय आहेर, पोलिस पाटील नारायण शिंदे यांना माहिती दिली. ही आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज दुकान मालक यांनी व्यक्त केला आहे. दुकानाला लागून जवळपास साठ ते सत्तर लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे श्री.कुंकुलोळ यांनी सांगितले.

किराणा दुकाना लगत असलेल्या कृषी सेवा केंद्राला सुद्धा आगीने वेढल्याने कृषी केंद्राचे सुद्धा नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही आग खूप भयंकर असल्याने संपुर्ण दुकानाची राख झाल्याने काहीच शिल्लक राहिले नाही. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. बुधवारी सकाळी सहा वाजता आग आटोक्यात आली.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT