सिल्लोड : सिल्लोड तालुक्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता सिल्लोड-सोयगाव मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे त्यांच्या तालुक्यातील समर्थकांसह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्या उत्साहाचे वातावरण असून सिल्लोड तालुक्यात केलेले शक्तीप्रदर्शन त्यांना मंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत घेऊन जाणार का? याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सिल्लोड तालुक्यातील आतापर्यंतच्या सर्व सभेचे रेकॉर्ड येतील गर्दीने मोडले आहे. गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पंढरपूर येथे पाहिलेल्या गर्दीनंतर सिल्लोड येथे गर्दी बघायला मिळाल्याचे सांगत श्री. सत्तार यांच्या प्रचंड जनसमुदायाने भारावून गेल्याची भावना व्यक्त केली. यावेळी बोलताना श्री शिंदे यांनी ही सभा म्हणजे गद्दार म्हणणाऱ्यांना प्रति उत्तर असल्याचे म्हटले होते. जनसामान्यांना न्याय देत त्यांच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या नेत्याचाच मागे इतकी जनता असते हे आमदार अब्दुल सत्तार यांनी दाखवून दिले.
स्वागत व सभेसाठी इतका मोठा जनसमुदाय पहिल्यांदाच पहिला असे स्पष्ट केले.
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे सिल्लोड मतदारसंघात आगमन होताच सिल्लोड येथील रोड शो मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. यावरुन आ. सत्तार यांची तालुक्यात चलती असल्याचे दिसून आले. मात्र, आता त्यांनी जमविलेली गर्दी पाहून मुख्यमंत्री चांगलेच प्रभावित झाले. मात्र, त्यांचा मंत्रिमंडळात वर्णी लागणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मंत्रीपदाबाबत उत्सुकता?
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना मोठे शक्तिप्रदर्शन आ.सत्तार यांनी केले. आता मंत्री मंडळ विस्तारात त्यांचा समावेश हा चर्चेचा विषय तालुक्यात जोरदार सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.