0majhe_20kutumb 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये ३९ हजार नागरिक आजारी, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतून माहिती आली समोर

माधव इतबारे

औरंगाबाद : शहरातील ३९ हजार ४० नागरिक रक्तदाब, मधुमेह, किडनीसारख्या आजाराने त्रस्त असल्याचे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील १२ लाख ७१ हजार ४४० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, असल्याचे महापालिकेच्‍या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सोमवारी (ता. नऊ) सांगितले. कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी राज्यभर ‘माझे कुटुंब, माझे जबाबदारी’ मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने महापालिकेने शहरात विविध पथकांमार्फत सर्व्हेक्षणाची मोहीम हाती घेतली होती. यासंदर्भात श्रीमती पाडळकर यांनी सांगितले की, मोहिमेच्या दुसऱ्या टप्यात महापालिकेच्या ३७ आरोग्य केंद्राच्या २४१ पथकांनी १९ ऑक्टोबरपासून सर्व्हेक्षणास सुरुवात केली. १३ लाख ६२ हजार ६३१ नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार सहा नोव्हेंबरपर्यंत १२ लाख ७१ हजार ४४० नागरिकांची म्हणजेच ९३ टक्के जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ३९ हजार ४० जणांना रक्तदाब, मधुमेह, किडणीचे आजार असल्याचे आढळून आले. या रुग्णांचे मोबाईल नंबर पथकातील कर्मचाऱ्यांनी घेतले असून, त्यांच्या प्रकृतीवर कोविड नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जात असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

२७९ जण पॉझिटिव्ह
सर्व्हेक्षणात ७३ रुग्ण सारीचे तर व्हायरलचे आजार असलेले १४३१ जण आढळून आले. संशयित रुग्ण म्हणून १२१७ जणांना कोरोना चाचणीसाठी विविध आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले त्यातून २७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Satara Crime: मायणीत १७ लाखांच्या बेकायदेशीर जिलेटिन साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघा भावांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ!

US Airstrikes Iran : शस्त्रसंधी फसली! अमेरिकेचे इराणवर पुन्हा हवाई हल्ले, इराणचे अस्तित्व संपवण्याचा ट्रम्प यांचा इशारा

Samosa: खुसखुशीत बाहेरचा थर अन् आत खव्याचा गोडवा... या समोशाची गोष्टच वेगळी, रविवारच्या भारी ब्रेकफास्टची खास रेसिपी

Pune News: काठमांडूमध्ये दोनशे भाविक अडकले! पुण्यातील ५२ जणांचा समावेश, परवाने मिळूनही चीनकडून व्हिसा नाही

SCROLL FOR NEXT