coronavirus-graphic-web-feature.jpg
coronavirus-graphic-web-feature.jpg 
छत्रपती संभाजीनगर

CORONAVIRUS : औरंगाबादेत क्वारंटाईनची संख्या पोचली तब्बल साडे नऊशेवर 

मधुकर कांबळे

औरंगाबाद : कोरोना संसर्गाबरोबरच महापालिकेच्या क्वारंटाइन सेंटर्समध्ये क्वारंटाइन होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. सध्या शहरातील वेगवेगळ्या सेंटर्समध्ये ९५८ जणांना क्वारटाइन करण्यात आले आहे. महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांना अधिकाऱ्यांना एका करोना पॉझिटीव्ह रुग्णामागे किमान १५ जणांचे लाळेचे नुमने घेऊन त्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले आहेत. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

जास्तीत जास्त लोकांना क्वारंटाईन करुन त्यांची कोरोना चाचणी केल्यास कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण क्वारंटाईन सेंटरमध्येच सापडतील असा अंदाज ठोकताळा बांधला जात आहे. याशिवाय त्यांचा समाजात वावर कमी झाल्याने संपर्कातुन कोरोनाचे संक्रमण होणार नाही अशी यामागची भुमिका आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या वाढली आहे.

सध्या विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये ९५८ व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. देवगिरी कॉलेजच्या मुलांच्या वसतीगृहात १३४, एसआरपीएफ येथे ११८, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात ९६, गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात ७८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पदमपुरा येथील संत तुकाराम होस्टेलमध्ये ४३, कलाग्राम मध्ये १८, रेल्वेस्टेशन परिसरातील एमसीईडी होस्टेलमध्ये ३९, हॉटेल मेनॉरमध्ये ११, विद्यापीठातील सीएसएम वसतीगृहात ७२, विद्यापीठातील रमाई वसतीगृहात ३९, विद्यापीठाच्या विश्रामगृहात १५, विद्यापीठाच्या यशवंत वसतीगृहात ६८, विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग वसतीगृहात ११, विद्यापीठाच्या महर्षि शिंदे वसतीगृहात ७, नवखंडा येथे ७५, महसुल प्रबोधिनीमधअये १७, जैन होस्टेलमध्ये ७, जामा मशीद मध्ये ३४, देवगिरी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहात ४९, जिमखाना येथे १८, शासकीय बी.एड. कॉलेजच्या वसतीगृहात ९ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT