औरंगाबाद: मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. औरंगाबाद जिल्हा देशातील सर्वाधिक बाधित जिल्ह्यांच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहे, ही जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी कोरोनावर कसा अटकाव आणता येईल, काय उपाययोजना कराव्या लागतील, नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे अशा अनेक मुद्द्यावर आज दहा वाजता फेसबूक लाइव्हमध्ये माहिती दिली.
जिल्हाधिकारी फेसबूक लाईव्हमध्ये बोलताना म्हणाले की, सध्या शेजारच्या काही जिल्ह्यांत लॉकडाऊन आहे पण आपल्याकडे अजून लावलं गेलं नाही कारण लॉकडाऊनचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर भयानक असणार आहे. यासाठीच सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, विनाकारण बाहेर पडू नये, नियमांचं पालन करावं. हा लढा आपल्याला मिळून लढायचा आहे. औरंगाबादमधील बरीच कुटूंबे इथल्या उद्योगधंद्यावर चालतात, जर जिल्ह्यात लॉकडाऊन लावलं तर सामान्यांपासून सर्वांचे हाल होण्याची शक्यता आहे. पण प्रशासन उद्योगधंद्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेईल.
फेसबूक लाईव्हची लिंक-
जिल्हाधिकाऱ्याच्या फेसबूक लाईव्हमधील प्रमुख मुद्दे-
- कोरोनामुक्तीसाठी एकजूटीने लढा दिला पाहिजे.
-लोकांना त्रास होऊ नये म्हणून सध्या तरी लॉकडाऊनचा विचार नाही पण परिस्थिती हाताबाहेर जाता नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
-रात्रीच्या पाहणीत नागरिक विनाकारण बाहेर पडताना दिसून आले.
-ताप, खोकला असल्यास जवळच्या आरोग्यकेंद्रात तपासणी करून घ्यावी.
-औद्योगिक शहर त्यामुळे लॉकडाऊनचा निर्यण घेताना सर्व मुद्यांचा विचार केला जाईल
- सध्या रुग्णांसाठी बेड भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. कुणीही याबद्दल काळजी करू नये.
-सर्वांना योग्य ट्रिटमेंट दिली जाईल ही राज्यशासनाची
- आजार अंगावर नका काढू.
-आतापर्यंत राज्य सरकारकडून १२० कोटींची मदत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.