कोरोनाने मृत्यू झालाय, पण कागदपत्रे नाहीत sakal
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाने मृत्यू झालाय, पण कागदपत्रे नाहीत; शासनाचे महत्वाचे पाऊल

कोरोना मृत्यू प्रमाणपत्र नसलेल्यांचा प्रस्ताव जिल्हास्तरीय कमिटीकडे पाठविणार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मृत्यू प्रमाणपत्र, कोरोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट नसलेल्यांना ही मदत कशी मिळेल, अशी विचारणा करताना रुग्णाचे नातेवाईक दिसत आहे, अशा नातेवाईकांचे प्रस्ताव जिल्हास्तरीय कमिटीकडे पाठवावेत, असा ठराव शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.
राज्य शासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचले आहे. परंतु यात कागदपत्रासाठी रुग्णाच्या नातेवाइकांना अनेक अडचणी येत असल्याचे सदस्यांनी सभेसमोर मांडले. यात कोरोनाने मृत्यू झाले, पण त्याच्या नातेवाइकांकडे कागदपत्रे नाहीत. त्याला काही पर्याय आहे का, संबंधित ग्रामपंचायत, मनपा प्रमाणपत्र देत नाही.

अशा परिस्थितीत संबंधित वारसांना ५० हजारांची मदत कशी भेटणार?, असा प्रश्न आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी उपस्थित केला. ज्यांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्टही नाही, अशांच्या नातेवाइकांना मदत कशी भेटणार, असा सवाल समाजकल्याण सभापती मोनाली राठोड यांनी केला. तर रुग्णाचा मृत्यू जर कोरोनामुळे झाला असेल, तर संबंधित ग्रामपंचायतीने मृत्युपत्र द्यावे, असा ठराव घेण्याची मागणीही गलांडे यांनी केली.

या रुग्णांवर अंत्यविधी शहरात झालेले आहेत, त्यामुळे ग्रामपंचायत देणार नाही,असे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड म्हणाले. ग्रामपंचायतीने तसे प्रमाणपत्र दिले तर कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढते. कोरोनाच्या काळातील मृत्यू लपवले की काय?, असा प्रश्न उपस्थित होईल. निमोनिया, श्वसनाच्या विकाराने मृत्यू झालेले, अशांचे मृत्यू गृहित धरले, तरच मदत मिळू शकते, असे सदस्य मधुकर वालतुरे म्हणाले, अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे हे प्रस्ताव पाठवावे, असा ठराव मंजूर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

भन्नाट योजना! बारावी, आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना ११ महिने नोकरीपूर्व प्रशिक्षण; दरमहा मिळतील ६,००० ते १०,००० रुपये

आजचे राशिभविष्य - १८ मे २०२६

प्रोटीन, फायबर आणि चवीचा जबरदस्त कॉम्बो! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा दुधी-चणा डाळ पराठा

SCROLL FOR NEXT