vaccination sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : कोरोनाचा दुसरा डोस अडकला ५० टक्क्यांवर

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती पुन्हा मंदावली

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती पुन्हा मंदावली आहे. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहेत. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ८२ टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांच्या आत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाईन वर्कर्स यांना प्राधान्य दिले. त्यानंतर ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ वर्षातील व्याधीग्रस्तांना लस देण्यात आली. सध्या १८ ते ४४ वयोगटातील मुलांना देखील लस दिली जात आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ६० दिवसांनी दुसरा डोस घेण्याची मुदत सुरुवातीला देण्यात आली. त्यानंतर ही मुदत ८४ दिवसांची करण्यात आली तर कोवॅक्सिन लसीसाठी दोन डोसमधील अंतर २८ दिवसांचे आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताच नागरिक लसीकरणासाठी रांगा लावतात. पण लाट ओसरताच लसीकरण केंद्रावर गर्दी कमी होते.

त्यामुळे प्रशासनाने लस घेतली तरच पेट्रोल मिळेल, रेशन घेण्यासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक असेल, असे निर्णय घेतले होते. त्यानंतर काही काळ लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला पण पुन्हा एकदा केंद्रावरील रांगा गायब झाल्या आहेत. त्यामुळे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. महापालिकेला लसीकरणाचे ११ लाख २५ हजार ६५२ एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी नऊ लाख २७ हजार ३७५ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. १५ ते १८ वयोगटातील ३६ हजार ८३२ मुलांचा समावेश आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ८२.४४ टक्के एवढी आहे.

सुमारे दोन लाख नागरिक लसीविना

शहरात लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या पाच लाख ४७ हजार १७८ आहे तर एकही डोस न घेतलेल्यांची संख्या एक लाख ९७ हजार ६५२ एवढी आहे. आत्तापर्यंत पहिला आणि दुसरा डोस मिळून १४ लाख ८ हजार ४४३ नागरिकांचे लसीकरण झाले असल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer च्या जीवाला होता धोका, BCCI च्या मेडिकलने टीमने वेळीच पावलं उचलली नसती, तर...

Latest Marathi News Live Update : कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव भाजपामध्ये

Video : ईश्वरी करणार राकेशचा अर्णवच्या खुनाचा प्लॅन फेल; प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "सगळे मठ्ठ आहात का ?"

Crime News : भारतीयांनो परत जा म्हणत भारतीय महिलेवर अत्याचार; 'या' देशात घडलेल्या घटनेने जग हादरले, हल्लेखोर थेट घरात घुसले अन्…

ठरलं! ‘कांतारा चॅप्टर 1’ वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर करणार एन्ट्री, तारिख जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT