औरंगाबाद : कोरोना संसर्गाची (Corona) तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी दुसऱ्या लाटेत बाधितांचा (Corona Test In Aurangabad) आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी (ता. २६) शहराचे सहा एन्ट्री पॉइंट, नऊ सरकारी कार्यालयात ९१४ जणांची ॲन्टीजेन पद्धतीने तपासणी केली. तसेच रविवारी (ता. २५) विमातळ व रेल्वेस्टेशनवर ८० जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. पण यातून कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. कोरोना संसर्गाची दुसरी लाट गेल्या महिनाभरापासून ओसरली आहे. शहरात (Aurangabad) दररोज कधी १० च्या आत तर कधी २० पर्यंत बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे शहरातील महापालिकेचे (Aurangabad Municipal Corporation) कोविड केअर सेंटर, खासगी रुग्णालयातील कोविड कक्ष रिकामे झाले आहेत.(aurangabad corona updates one thousand test reported negative glp88)
ऑगस्ट महिन्यात कोरोन संसर्गाची तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र जुलै महिना संपत आलेला असताना संसर्ग अद्याप नियंत्रणात आहे. सोमवारी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवर ७६३ जणांची ॲन्टीजेन चाचणी करण्यात आली. त्यासोबतच नऊ सरकारी कार्यालयात १५१ जणांची चाचणी करण्यात आली. पण एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही. रविवारी रेल्वेस्टेशन व विमानतळावर आलेल्या ८० प्रवाशांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. त्यातून देखील एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.
एन्ट्री पॉइंटवरील चाचण्या
--
चिकलठाणा-११६
हर्सूल टी पॉइंट- १०९
कांचनवाडी- २५४
झाल्टा फाटा-१४४
नगर नाका- ७३
दौलताबाद टी पॉइंट- ६७
-
सरकारी कार्यालयातील चाचण्या
--
महापालिका मुख्यालय-९
पोलीस आयुक्त कार्यालय-३५
उच्च न्यायालय-१५
जिल्हाधिकारी कार्यालय-२७
विभागीय आयुक्त कार्यालय- २
आरटीओ कार्यालय-२०
जिल्हा न्यायालय-१३
कामगार उपआयुक्त कार्यालय- १०
कामगार कल्याण कार्यालय-२०
-
रेल्वेस्टेशन-५०
विमानतळ-३०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.