File Photo
File Photo 
छत्रपती संभाजीनगर

​काल फुलांचा वर्षाव आज पोलिसांना मारहाण, त्या पितापुत्राच्या आवळल्या मुसक्या 

मनोज साखरे

औरंगाबाद  : लॉकडाऊनच्या काळात दुचाकीने ट्रिपलसीट फिरणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी अडविले. ते न थांबल्याने दंडुका उगारला म्हणून आणखी दोघांना घेऊन येत टोळक्याने पोलिसांवर हल्ला केला. एवढेच नाही तर पोलिसांच्याच काठीने पोलिसांना बेदम मारहाण केली.

ही गंभीर घटना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गुरुवारी (ता. नऊ) दुपारी घडली. यात दोन पोलिस जखमी झाले असून, टोळक्यातील दोघांना अटक करण्यात आली. 
मारहाणीत वाहतूक शाखेचे शिपाई जनार्दन जाधव व जखमी झाले. सिटीचौक पोलिसांनी गुरुवारी

(ता. नऊ) पिता-पुत्राला अटक केली; तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले, अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. 
शेख फारुख शेख कादर (वय ५२) आणि शेख शाहरुख शेख फारुख (वय २४, दोघेही रा. रोजेबाग, ईदगाह) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. शेख साजीद शेख फारुख व शेख समीर शेख सलीम पसार आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनाचे संकट वाढत असल्याने लॉकडाऊनच्या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात पोलिसांनी आता कडक धोरण राबविण्यास सुरवात केली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयालगत असलेल्या अण्णा भाऊ साठे चौकात पोलिस नाकाबंदी आणि वाहन तपासणी करीत होते. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

लोकांना अडवून घराबाहेर पडण्याचे कारण विचारले जात होते. पोलिस जिवाचे रान करून कर्तव्य बजावत असताना दुपारी पावणेबारा ते साडेबाराच्या सुमारास वाहतूक शाखा व सिटीचौक पोलिस ठाण्याचे कर्मचारी अण्णाभाऊ साठे चौकात बंदोबस्तासाठी कार्यरत होते. त्यावेळी एका दुचाकीवर अल्पवयीन बालकाला मागे बसवून शेख साजीद व शेख समीर असे ट्रिपलसीट जात होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबविले; मात्र ते थांबले नाहीत.

त्यामुळे दोन दंडुके पोलिसांनी त्यांच्यावर उगारले. यात एकाला दंडुका लागला. याचाच राग आल्यानंतर अर्ध्या तासांनी पोलिसांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने शेख साजीद याने वडील शेख फारुख व भाऊ शेख शाहरुख यांना बोलावून घेतले. त्यानंतर हे दोघेही बुलेटने (एमएच-२०-एफएफ-६४६४) अण्णाभाऊ साठे चौकात आले. त्यानंतर या पाचही जणांनी पोलिसांशी वाद घातला. वादावादीत एकाने ‘पोलिसांना बघून घेतो,’ असे धमकावले. त्यामुळे पोलिसाने त्याला दंडुका मारला. यानंतर मात्र पाचही जण पोलिसांवर तुटून पडले.

वाहतूक शाखेचे शिपाई जनार्दन जाधव यांच्या हातातील काठी घेऊन त्यांनाच मारहाणीला सुरूवात केली. हा प्रकार पाहून त्यांच्या मदतीला महिला कर्मचारी धावून गेली. मात्र या दरम्यान जाधव जखमी झाले होते. त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली. लागल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ घाटीत दाखल केले. या कालावधीत हल्लेखोर पसार झाले. या प्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पिता पुत्राचा शोध घेत त्यांना अटक केली.

काल फुलांचा वर्षाव आज मारहाण 
बुधवारपासून शहरात सायंकाळी सातपासून कडक संचारबंदी लागू करण्यात आली. यादरम्यान पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. सिटी चौक, राजाबाजार, शहागंज, चेलीपुरा आदी भागात पथसंचलन करणाऱ्या पोलिसांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. त्यामुळे पोलिसांचे मनोबल उंचावले; पण गुरुवारी पोलिसालाच मारहाण झाली. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT