Aurangabad Crime First job then oppression woman broke down door reached the police station sakal
छत्रपती संभाजीनगर

आधी नोकरी मग अत्याचार; महिला दरवाजा तोडून पोहचली पोलिस ठाण्यात

विवाहितेला डांबून दीड महिना अत्याचार करणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : नोकरी लावण्‍याचे आमिष दाखवून विवाहीतेवर तब्बल दिड महिने अत्याचार करणाऱ्याला मुकुंदवाडी पोलिसांनी बुधवारी (ता. दोन) अटक केली. त्याला ५ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी दिले.

संभाजी आसाराम शिंदे (वय २४, रा. अंबडगाव, रोशनगाव ता. बदनापूर जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात ३२ वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली. त्‍यानूसार, आरोपी संभाजी शिंदे हा फिर्यादीच्‍या ओळखीचा आहे. त्‍याने फिर्यादी व तिच्‍या १४ वर्षीय मुलाला कंपनीत कामाला लावून देतो असे आमिष दाखविले होते. त्‍यानूसार त्‍याने दोघांचे कागदपत्र घेतले होते. २६ नोव्‍हेंबर २०२१ रोजी आरोपीने फिर्यादी आणि तिच्‍या मुलाला चहाचे कागदी कप बनविणाऱ्या एका कंपनीत कामाला लावले. सायंकाळी सातच्‍या सुमारास सुट्टी झाली, तेंव्‍हा आरोपी तेथे कार घेवून आला. त्‍याने तुम्हाला घरी सोडतो असे सांगितले. त्‍यावेळी आरोपीसोबत त्‍याचा एक साथीदार देखील कारमध्ये होता. दरम्यान आरोपीने घराकडे जाण्‍या ऐवजी कार क्रांतीचौककडे वळवली.

क्रांतीचौक परिसरातील एका मंगल कार्यालयाच्‍या जवळील एका मोकळ्या मैदानातील एका घरात त्‍यांना नेले. तेथे आरोपी व त्‍याच्‍या साथीदाराने दोघांना मारहाण केली. त्‍यानंतर फिर्यादी महिलेला घरातील दुसऱ्या खोलीत नेत तिच्‍यावर अत्याचार केला. त्‍यानंतर महिलेला व मुलाला घरात डांबून घराला कुलूप लावून आरोपी दोघेजण तेथून निघुन गेले. हा प्रकार तब्बल दिड महिने सुरु होता. फिर्यादी व मुलाने बराच प्रतिकार केला मात्र मोकळे मैदान आणि बाजुला बिल्डींगचे काम सुरु असल्याने त्‍यांचा आवाज कोणालाही जात नव्‍हता.

१५ जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्‍या सुमारास आरोपी आला, मात्र फिर्यादीच्‍या मुलाने प्रतिकार करत सुटका करण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याला आरोपीने दोघांना बेदम माराहण केली. त्‍यानंतर पुन्हा महिलेला व तीच्या मुलाला घरात डांबले आणि घराचा कडी कोयंडा लावून तेथून तो निघून गेला. मात्र त्यानंतर फिर्यादी आणि तिच्‍या मुलाने दरवाजा जोर जोरात ओढल्याने दरवाजा उघडला गेला. त्यामुळे दोघांचीही सुटका झाली. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झालेला आहे. आरोपीला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सराकरी वकील भागवत काकडे यांनी युक्तीवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

SCROLL FOR NEXT