Aurangabad Crime News 
छत्रपती संभाजीनगर

गाळे बांधण्यास विरोध करत ग्रामसेवकावर प्राणघातक हल्ला, औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

संतोष गंगवाल

देवगाव रंगारी (जि.औरंगाबाद) : या जागेवर गाळे का बांधतात असे म्हणत गावातील चार जणांनी ग्रामसेवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना खामगाव (ता.कन्नड) येथे शुक्रवारी (ता.नऊ) दुपारी घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी  ग्रामसेवक कल्याण साहेबराव पाटील, खामगाव यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, की  शुक्रवारी (ता.नऊ) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास खामगाव मिळकत क्रमांक २९७ मध्ये  ग्रामपंचायतीच्या वतीने सहा गाळ्यांचे बांधकाम चालू करण्याचे नियोजन करत असताना सदरचे बांधकामासाठी सर्व साहित्य घेऊन नियोजित जागेवर पडलेले असून आज गाळ्याचे पायाचे (बेसमीट) बांधकाम सुरू करण्यासाठी सरपंच योगेश जगन्नाथ कवडे यांच्यासह ग्रामसेवक उभे असताना बापू हरि खडे, सागर हरी खडे, हरी शेकु खडे, संजय हरी खडे हे चौघे येथे येऊन या जागेवर बांधकाम करु नये म्हणून धक्काबुक्की करु लागले.

त्यावेळी ग्रामसेवक यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता कामावरील मजुर वाल्मिकी काळे हे काम करीत असताना त्यास बाजूला जाण्यासाठी सांगत बापू हरि खडे यांनी ग्रामसेवक यांच्यावर लोखंडी राॅडने डोक्यावर मारत प्राणघातक हल्ला केला. सागर खडे, हरी खडे व संजय खडे यांनी ग्रामसेवकांच्या पायावर आणि पाठीवर काठीने मारहाण केली. येथून कसाबसे पळ काढून जीव वाचवून बाजूला ते पळाले. खामगाव येथील ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी जखमी ग्रामसेवकाला खासगी वाहनातून देवगांव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मार जास्त असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


या फिर्यादीवरून बापू हरि खडे, सागर हरी खडे, हरी शेकु खडे, संजय हरी खडे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणुन प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवगाव रंगारी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड तपास करित आहेत.

संपादन - गणेश पिेटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT