Police Take Action Against Fake Marriage Gang In Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

लग्नाळू तरुणांनो सावधान! उतावळेपणा पडू शकतो महागात, पोलिसांची औरंगाबादेत मोठी कारवाई

संतोष गंगवाल

देवगाव रंगारी (जि.औरंगाबाद) : बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश देवगाव रंगारी (ता.कन्नड) पोलिसांनी शुक्रवारी (ता.२६) केला आहे. लग्नाच वय झालेल्या तरुणांना जाळ्यात ओढून त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम ही टोळी करत होती. या प्रकरणी देवगाव रंगारी पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना देवगाव रंगारी येथे अटक केली आहे.  याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे घेऊन फसवणूक करुन लग्न करणाऱ्या टोळी असल्याची माहिती देवगाव रंगारी पोलिसांना खबऱ्याकडुन मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी बनावट नवरदेव तयार करून त्या मार्फत त्या टोळीशी संपर्क साधुन वधु पाहिजे अशी माहिती दिली.

त्यानुसार बोलणी करण्यासाठी येथील फाट्यावर असलेल्या हाॅटेल पद्मावतीवर शुक्रवारी दुपारी बोलविण्यात आले. तत्पूर्वी पोलिसांनी साध्या वेषात थांबवून सापळा रचून ठेवला.ठरल्याप्रमाणे सदरील टोळी वाहनातून (एमएच १५ ईइ ०२५६) आली असता त्यातुन तीन महिला व एक पुरुष उतरले. खबऱ्याने इशारा करताच तेथे थांबलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून सखोलपणे चौकशी केली असता या टोळीची म्होरक्या आशा विलास खडसे (राहणार, रेल्वे स्टेशन, वाशिम) ही असल्याचे समोर आले. तिच्या सोबत कल्पना सुधाकर पाटील (राहणार कासगाव, मुंबई), सविता चंद्रकला कुलकर्णी (राहणार नाशिक, निलेश दिलीप पाटील (राहणार नाशिक) आदी होते. 


सहायक पोलिस निरीक्षक संजय अहिरे यांनी आशा खडसे हिची चौकशी केली असता तिच्या मोबाईलमध्ये एकाच महिलेचे अनेक युवकाशी लग्न लावल्याचे फोटो आढळुन आले. ही टोळी एजंटामार्फत लग्नासाठी इच्छुक युवकांना जाळ्यात अडकवून त्यांच्या परिवाराशी संपर्क साधुन पैसे घेवून लग्न लावून देत असे. लग्नानंतर काही दिवसांतच आपल्या माहेरी सोबत दागिने घेऊन पोबारा करत असे. असाच प्रकार माळीवाडगाव (ता.गंगापूर) येथे घडला होता. दरम्यान या टोळीतील आरोपींकडुन पोलिसांना सात मोबाईल, सात महिलांचे बनावट आधार कार्ड, एक इंडिका कार असा साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे या टोळीने जळगाव, नाशिक, औरंगाबाद व गुजरात राज्यातील अनेकांची फसवणूक करुन पैसे उकळल्याचे समोर आले आहे. 

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, सहायक पोलिस निरीक्षक संजय अहिरे, पोलिस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड, अंमलदार आप्पासाहेब काळे, मनोज लिंगायत, लता भोसले, श्री.ठोंबरे, श्री.गवळी, श्री.जाधव, श्री.गिरी आदींच्या पथकाने केली. विवाह झाल्यानंतर संबंधित तरुणी सहा ते सात दिवस सासरी राहत असे. त्यानंतर अगोदर ठरल्याप्रमाणे ती तरुणी सासरच्या घरातील सर्व दागदागिने चोरून माहेरी जाते, असे म्हणून तिथून निघून परत येत असे आणि मग सासरी जाण्यास नकार द्यायची. अशाप्रकारे काही जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मात्र, समाजातील प्रतिष्ठेपोटी हे नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. नागरिकांनी सतर्क राहत निःसंकोचपणे पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Market Yard Traffic Advisory : बाबा आढाव यांच्या अंत्यदर्शनामुळे मार्केटयार्डात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तात्पुरते मार्ग बदल!

‘महाडीबीटी’वरील शेतकऱ्यांच्या अर्जांची पूर्वसंमती बंद! ट्रॅक्टरसह सगळ्याच यंत्रांची थांबली खरेदी; निधीची गरज ३१,८३२ कोटींची अन्‌ आहेत अवघे ११८९ कोटी रुपये

Baba Adhav refused Maharashtra Bhushan honour :...म्हणून बाबा आढाव यांनी नाकारला होता राज्याचा सर्वोच्च सन्मान, ‘महाराष्ट्र भूषण’!

अविश्रांत चळवळ! अखेरपर्यंत श्रमिकांसाठी लढत राहिले, सहा वर्षांपासून 'या' दुर्धर आजाराशी दिला लढा

Pune Airport Road Crash : मद्यधुंद चालकाची बेफाम गाडी; एअरपोर्ट रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात; विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT