Data Breach 
छत्रपती संभाजीनगर

डाटा चोरी प्रकरण: पुणे पोलिसांचा औरंगाबादेत छापा, आरोपीच्या घराची घेतली झडती

सुषेन जाधव

औरंगाबाद : बँकातील डॉरमंट अकाऊंटच्या (निष्क्रिय खाती) गोपीनीय माहितीचा डेटा लीक करून कोट्यवधी रुपयांची सायबर चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोठ्या टोळीचा पुणे पेालिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात औरंगाबाद येथील राजेश शर्मा, परमजीत संधू आणि विशाल बोंद्रे अशा तीन जणांना अटक करण्यात आली. गुरुवारी (१८ मार्च) बालाजी नगर येथे राहणाऱ्या विशाल बोंद्रे याच्या घराची झडती पुणे पोलिसांनी घेतली.


औरंगाबादमधील एका चॅनेलचे संचालक राजेश शर्मा आणि परमजित संधू या दोघांसह विशाल बोंद्रे यालाही अटक करण्यात आली. याशिवाय याप्रकरणात एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. औरंगाबादेतील हे तिन्ही जण सदर डाटा घेऊन शहरातील एका व्यापाऱ्याला विक्री करणार होते. यासाठी राजेश शर्मा आणि परमजित संधू हे दोन्ही गेले होते. या प्रकरणात पुणे पोलिसांनी औरंगाबादसह गुजरात आणि इतर राज्यातून आरोपींना अटक केली आहे. यातील आठ आरोपींना २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली असून गुरुवारी दोन जणांना कोर्टात सादर करण्यात आले आहे.


डाटा चोरी प्रकरणात औरंगाबादसह हैदराबाद, गुजरात, मुंबई आणि लातूरसह अन्य शहरांमध्येही छापे टाकण्यात आले. या प्रकरणातील औरंगाबादच्या तिन्ही जणांचा या प्रकरणातील सहभाग आणि त्यांची अन्य माहिती काढून घेण्यासाठी पुण्याहून १३ पथके रवाना करण्यात आली होती. गुरुवारी औरंगाबादला पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार हे बालाजीनगर येथील विशाल बोंद्रे याच्या घरी गेले होते. त्या ठिकाणी काही महत्त्वाच्या कागदपत्रांचा तपास केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० वर्षांपूर्वीचे 'ते' पत्र अखेर सापडले, शिक्षकांच्या निवडश्रेणीचा मार्ग मोकळा, पत्रात नेमकं काय लिहिलंय?

लोहगडावर पर्यटकांची वाढती गर्दी; केतन अग्रवाल प्रकरणामुळे घटनास्थळ ठरतंय आकर्षण

रेल्वेत 'पहिले या, पहिले निवडा' तत्त्वावर नोकरी मिळणार! मुंबई ते सूरतदरम्यान 175 पदांची भरती होणार; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

Satara farmers: आत्मनिर्भरतेकडे शेतकऱ्यांची मोठी झेप; २५ हजार क्विंटल घरगुती सोयाबीन बियाण्यांची निर्मिती, साताऱ्यात शेतकऱ्यांची नवी क्रांती!

Maharashtra Housing Rules: सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवे नियम २०२६ जाहीर; स्वयं-पुनर्विकासासाठी जमिनीच्या १० पट कर्जमर्यादा, थकीत वसुलीसाठी कडक तरतुदी

SCROLL FOR NEXT