Waluj Crime News 
छत्रपती संभाजीनगर

आगाऊ रक्कम देताच माल पाठवण्यात येईल, असे बनावट ई-मेल करुन वाळूजच्या उद्योजकाची १८ लाखांची फसवणूक

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) - कच्चामाल पाठवणाऱ्या कंपनीच्याच मेलसारखा बनावट ईमेल आयडी तयार करून कच्चा मालासाठी आगाऊ रक्कम देताच माल पाठवण्यात येईल, असे सांगून वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका उद्योजकाची १८ लाख २८ हजार ३१७ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार बुधवारी (ता.३१) रोजी उघडकीस आला.


विनायक शंकरराव देवळानकर यांची वाळूज औद्योगिक वसाहतीत मनू इलेक्ट्रिकल्स या नावाची कंपनी आहे. कंपनीला बाहेर देशातून कच्चामाल मागविण्यात येतो. त्यामुळे देवळाणकर हे सप्टेंबर २०२० पासून मे आय के टेक कंपनी लिमिटेड ३१७ सागदो या कोरिया येथील कंपनीचे प्रतिनिधी के एल जंग रा. औरंगाबाद यांच्या माध्यमातून कंपनीच्या संपर्कात होते. ते kljung०८३०gmail.com मेल आयडी वरून वाळूज येथील मनू इलेक्ट्रिकल्स या कंपनीशी समन्वय साधत असत. कंपनीला इलेक्ट्रॉनिक्सचा कच्चामाल घेण्यासाठी याच मेल आयडी वरून ते पत्रव्यवहार करत होते. याच ईमेल आयडी सारखा दिसणाऱ्या बनावट ईमेल आयडी वरून मनू इलेक्ट्रिकल्स कंपनीला प्रोफार्म इनव्हॉइस प्राप्त झाले.

त्यात आय के टेक कंपनी लिमिटेड आयबन बँक अकाऊंट नंबर चाथम दक्षिण कोरिया. असा पत्ता दिलेला होता. व्यवसाय करताना दुसऱ्या कंपनीवर विश्वास ठेवावा लागतो. त्याप्रमाणे देवळाणकर यांनी विश्वास ठेवत वाळूज येथील कोटक महिंद्रा बँक शाखेतून मनू इलेक्ट्रिकल्स या कंपनीच्या अकाउंट मधून २३ आँक्टोबर २०२० रोजी १८ लाख २८ हजार ३१७ रुपये पाठवून दिले. त्यानंतर दोन दिवसांनी के एल जंग यांना मोबाइल करून कच्च्या माला बाबत खात्री केली असता, तुमचे पेमेंट आमच्या कंपनीला मिळाले नाही. असे सांगण्यात आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देऊळकर यांनी २९ ऑक्‍टोबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांनी चौकशी करून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यावरून आय के टेक कंपनी लिमिटेड आयबन, चाथम येथे बँक खाती असलेल्या अनोळखी इसमा विरुद्ध ऑनलाइन फसवणूक केल्या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT