Aurangabad Crime News 
छत्रपती संभाजीनगर

हे वागणं बरं नव्ह! दोघे पोलिस कर्मचाऱ्यांचे केवळ पाचशे रुपयांवरुन रस्त्यावर कपडे काढून तुंबळ हाणामारी

ईश्वर इंगळे

सोयगाव (जि.औरंगाबाद) : सोयगाव तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने प्रवेश केला असतानाच कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या सोयगाव पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांत रविवारी (ता.सात) पाचशे रुपयांच्या देवाण-घेवाणीतून ठाण्यातच हाणामारी झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चौधरी व शिंदे या दोन कर्मचाऱ्यांत पाचशे रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून सोयगाव बायपास रस्त्यावर कपडे काढून तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर त्यांची समजूत काढत सहकाऱ्याने पोलिस ठाण्यात आणले.

मात्र, पोलिस ठाण्यात पुन्हा या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत चौधरी नावाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्यांना बनोटी दुरक्षेत्राचे बिट जमादार दिलीप तडवी यांनी उपचारासाठी सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी न्याय वैद्यकीय तक्रार सोयगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.


चौकशी करून कारवाई
याबाबत सोयगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्याशी संपर्क साधला असता दोघांचे वैयक्तिक भांडण आहे. तरीही पोलिसांमध्ये झालेल्या मारहाणीबाबत चौकशी करून कार्यालयीन कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

संपादन - गणेश पिेटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati NICU Deaths : अमरावती हादरलं! जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षाला भीषण आग, ३ बालकांचा गुदमरून मृत्यू

मोठी बातमी! बाजार समिती कांदा लिलावासाठी खरेदी करणार बोरामणी हद्दीत ४० एकर जमीन; संचालक मंडळांची मंजुरी, आता पणन संचालकांच्या मान्यतेची प्रतीक्षा

बोगस शालार्थ आयडी! ‘एसआयटी’ने पुन्हा मागितली ३ महिन्यांची मुदतवाढ; ३ लाख कर्मचाऱ्यांच्या पडताळणीस लागतोय वेळ; थर्ड पार्टी तक्रारींवरही आता कार्यवाही

24 ऑगस्ट 2026 पंचांग! श्रावणी सोमवारला आज कोणते शुभ मुहूर्त? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - २४ ऑगस्ट २०२६

SCROLL FOR NEXT