छत्रपती संभाजीनगर

नियम पाळून शहराला पहिल्या टप्प्यातच ठेवा - जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण

आरटीपीसीआर चाचणी, लसीकरणावर राहणार भर

मधुकर कांबळे

औरंगाबाद: राज्य सरकारने अनलॉक (covid 19 unlock) करण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वानुसार तयार केलेल्या पाच लेवलपैकी औरंगाबाद ग्रामीणला तीसऱ्या स्तरातुन पहिल्या लेवलवर आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. आता महापालिका क्षेत्रातला पहिली लेवल अबाधित राखण्यासाठी जनतेने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. निर्बंधातील शिथिलतेमुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी आरटीपीसीआर चाचणी (rtpcr test), जास्तीत जास्त लसीकरणावर प्रशासनाचा भर असेल. नागरिकांनीही यासाठी पुढाकार घेण्याचेही त्यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्याालयात सोमवारी (ता.सात) आढावा बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, की व्यापाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. सोमवार (ता. सात ) पासून सात दिवसानंतर सर्व व्यापाऱ्यांनी त्यांच्यासह कर्मचाऱ्यांची चाचणी करावी. आरोग्य यंत्रणांनी अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर द्यावा. सध्या जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या नियंत्रणात असली तरी दर गुरुवारी जिल्ह्याचा आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणण्यात येतील. जिल्ह्यातील स्तरात सुधारणा व्हावी, यासाठी सातत्याने मस्कचा वापर, वारंवार हात धुणे, आरटीपीसीआर चाचणी, पॉझिटिव्हीटी रेट, ऑक्सिजन खाटा, ऑक्सिजन निर्मिती क्षमता, लसीकरण आदींचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्‍यक सूचना केल्या.

पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी सध्या शहराची पहिली लेवल आहे . ती आबाधित ठेवण्यासाठी लोकांनी स्वयंशिस्त पाळली पाहीजे. सीईओ डॉ. गोंदावले यांनी ५०० गावांमध्ये कोरोना रूग्ण आहेत. या ॲक्टिव्ह गावांच्या संख्येत घट व्हावी. यासाठी ग्रामीण भागात अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात येईल. असे सांगीतले. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनीही लसीकरण वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, रिता मैत्रेवार, अप्पासाहेब शिंदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT