Aurangabad Establish new Hersul Waste processing center
Aurangabad Establish new Hersul Waste processing center sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्र नव्याने उभारा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : हर्सूल येथील महापालिकेच्या सुका कचरा प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाला आग लागली होती. या प्रकल्पाचे शेड, मशिनरी नव्याने उभारून कचरा प्रक्रिया केंद्र एका महिन्यात सुरू करण्याचे तसेच चिकलठाणा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिकुमार पांडेय यांनी दिले आहेत. दरम्यान चिकलठाणा येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करताना तेरा पैकी दोन सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळून आल्याने संबंधित ठेकेदाराला दोन लाख रुपये दंड लावण्याचा आदेश दिला.

महापालिकेच्या हर्सूल येथील सुका कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या केंद्राला सोमवारी आग लागून झालेल्या नुकसानीची पाहणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केली. यावेळी त्यांनी इलेक्ट्रॉनिक केबल, इलेक्ट्रॉनिक मीटर, सीसीटीव्ही कॅमेरे, जळालेल्या शेड, बेलिंग मशीन, कन्वेअर बेल्ट, फोर क्लेप मशीनची पाहणी करून यांची माहिती घेतली. आग कशामुळे लागली याची चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या सुका कचरा प्रक्रिया केंद्राच्या शेड व मशिनरीची नव्याने उभारणी करून कचरा प्रक्रिया केंद्र एका महिन्यात सुरू करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले.

हर्सूल येथील दीडशे मेट्रिक टन क्षमतेच्या प्रकल्पाची पाहणी करून तेथे फायर सेफ्टी (अग्नी सुरक्षा) यंत्र उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर चिकलठाणा येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. एप्रिलमध्ये या प्रकल्पात आग लागून शेडचे व बेलिंग मशीन, प्री शॉर्टटींग मशीन, प्रोसेसिंग मशीन यांचे नुकसान झाले होते.

या केंद्राचे काम सात दिवसांत पूर्ण करून प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. या घनकचरा प्रकल्पाची पाहणी करत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही पाहणी केली. यावेळी तेरा कॅमेऱ्यांत पैकी दोन कॅमेरे बंद असल्याचे आढळून आल्याने तेथील ठेकेदाराला दोन लाख रुपये दंड लावण्यात आला. यावेळी शहर अभियंता एस. डी. पानझडे, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख तथा उपायुक्त सोमनाथ जाधव, स्वच्छता निरीक्षक विशाल खरात यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT