औरंगाबाद : लहेर एंटरप्राइजेस या कंपनीत आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत सुरवातीला काही प्रमाणात व्याजाची रक्कम देत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंतवणूकदार स्क्रॅप कंपनीच्या मालकासह त्यांच्या ओळखीतील तसेच मित्रांना ‘लहेर’च्या बाप लेकासह त्यांचा मेहुणा अशा चौघांनी तब्बल ३८ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.
हा प्रकार ४ नोव्हेंबर २०१८ ते ३ सप्टेंबर २०२१ दरम्यान एसटी कॉलनी, फाजलपुरा परिसरात घडला. याप्रकरणी चौघांविरोधात सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. जुनेद यासीन खान, गुलाम गौस यासीन खान (दोन्ही भाऊ), यासीन खान (जुनेदचा पिता) आणि जुनेदचा मेहुणा मोहसीन खान (सर्व रा. नारेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी शेख सलीम शेख युनूस (२७, रा. एसटी कॉलनी, फाजलपुरा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सलीमची जोगेश्वरी वाळूजमध्ये एस. ए. एंटरप्राइजेस नावाची स्क्रॅप कंपनी आहे.
ऑक्टोबर २०१८ मध्ये सलीमचा मित्र शादाब याच्या माध्यमातून ‘लहेर’चा जुनेद यासीन खान याच्यासोबत ओळख झाली होती. त्याने आपण व्हेरॉक, एल ॲण्ड टी सारख्या कंपन्यांचे स्क्रॅप खरेदी-विक्रीचे काम घेतो, तुम्ही माझ्या कंपनीत पैसा गुंतवा म्हणत ८ ते ११ टक्के नफा देण्याचे आमिष दाखविले.
सुरवातीला नोव्हेंबर २०१८ मध्ये एक लाख गुंतविल्यानंतर त्यावर सात हजार नफा, त्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये दीड लाखांच्या गुंतवणुकीवर साडेआठ हजार रुपये नफा असे करत करत जुनेदसह त्याचा भाऊ, त्याचे वडील आणि त्याचा मेहुणा अशा चौघांनी शेख सलीमकडून जुलै २०२१ पर्यंत साडेआठ लाख रुपये घेतले. त्यापैकी केवळ ७५ हजार ५०० रुपये जुनेदने नफ्यापोटी परत केले. त्याच दरम्यान जुनेद याने शेख सलीम याच्या ओळखीतील तसेच मित्रांकडून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत तब्बल ३८ लाख ५० हजार रुपये उकळले. मात्र, परताव्यापोटी रक्कम दिली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.