Satish Chavan 
छत्रपती संभाजीनगर

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांची विजयाच्या दिशेने घोडदौड; दोन फेऱ्या बाकी, ४१ हजार १९८ मतांची घेतली आघाडी    

प्रकाश बनकर/मधुकर कांबळे

औरंगाबाद : मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीचे निकाल शुक्रवारी (ता.चार) पहाटे सव्वा एकच्या सुमारास जाहीर करण्यात आले आहे. या फेऱ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना २६ हजार ७३९ मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना १४ हजार ४७१ मते मिळाली आहेत. चव्हाण यांना तिन्ही फेऱ्या मिळून एकूण ८१ हजार २१६ मते, तर बोराळकर यांना ४० हजार १८ इतकी मते मिळाली आहेत. यात सतीश चव्हाण यांना ४१ हजार १९८ मतांची आघाडी मिळाली आहेत. तिसऱ्या फेरीत एकूण १६ हजार ४४ बाद मते झाली आहेत. तिसऱ्या फेरीत सचिन ढवळे (प्रहार संघटना) ७ हजार ९९४,  नागोराव पांचाळ (वंचित बहुजन) ६ हजार ४०३,  अपक्ष रमेश पोकळे ५ हजार ८२८ आणि  सिद्धेश्वर मुंडे ५ हजार ९७६ अशी मते मिळाली आहेत. आता दोन फेऱ्या बाकी राहिल्या आहेत.

- मतमोजणीच्या दुसऱ्या फेऱ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना २६ हजार ६२७ मते मिळाली असून त्यांची एकूण मते ५४ हजार ४७७ झाली आहेत. या फेरीत चव्हाण यांनी १२ हजार ६३८ मतांनी आघाडी घेतली आहे.भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना १३ हजार ९८९ मते मिळाली आहेत. त्यांची  दुसऱ्या फेरी अखेर एकूण २५ हजार ५५४ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांना १ हजार ५१४ मते मिळाले असून दोन्ही फेरींचे त्यांचे एकूण ५ हजार १४ मते झाली आहेत. दुसरे अपक्ष उमेदवार सिद्धेश्‍वर मुंडेंना १ हजार ७९७ मते मिळाले आहेत. त्यांची दोन्ही फेरींचे एकूण मते ४ हजार ३२२ झाली आहेत.

- मतमोजणीची पहिली फेरी रात्री साडेआठला पूर्ण झाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना २७ हजार ८५०, भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकरांना ११ हजार ५५८, अपक्ष सिद्धेश्‍वर मुंडेंना २ हजार ५२५ व रमेश पोकळे यांना ३ तीन हजार ५०० मते मिळाली आहे.  पहिली फेरीत वैध ५० हजार ६२० मते, तर अवैध ५ हजार ३८१ ठरली आहेत.
 

- पोस्टल मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना ६०० मते, तर भाजपचे शिरीष बोराळक यांना २८६ मते मिळाले. यात चव्हाण यांनी ३१४ मतांनी आघाडी घेतली आहे. पोस्टलची एकूण १२४८ मते आहेत. त्यातील १७५ अवैध ठरली आहेत.
- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्राम समोरच्या मराठवाडा रिएल्टर्स प्रा. लि. येथे गुरुवारी (ता.तीन) सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतपत्रिकेवर काही मतदारांनी मराठा आरक्षणाविषयी लिहिले. दुसरीकडे काहींनी मोबाईल नंबर तर काहींनी गंमतीशरपणे स्वतःचे नावे लिहिल्याचे प्रकार समोर आले आहेत. ही सर्व मते बाद होणार आहेत. एकूण एक हजार २६० पोस्टल मते आहेत.
- मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज आहे. ५६ टेबलांवर मतमोजणीच्या पाच फेऱ्या होतील. सुरवातीला सर्व पेट्यांतील मतपत्रिका एका दहा बाय दहाच्या मिक्सिंग ड्रममध्ये टाकल्या जातील. त्यानंतर दोन सभागृहांमध्ये प्रत्येकी २८ टेबलवर २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे मोजणी केली जाईल. मतमोजणीसाठी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून येथे दाखल झाले आहेत.

मतपत्रिकेवर काहींनी लिहिले मराठा आरक्षणाविषयी : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्राम समोरच्या मराठवाडा रिएल्टर्स प्रा. लि. येथे गुरुवारी सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.मतपत्रिकेवर काही मतदारांनी मराठा आरक्षणाविषयी लिहिले. दुसरीकडे काहींनी मोबाईल नंबर तर काहींनी गंमतीशरपणे स्वतःचे नावे लिहिल्याचे प्रकारसमोर आले आहेत. ही सर्व मते बाद होणार आहेत. एकूण एक हजार २६० पोस्टल मते आहेत.


पोस्टल बॅलेटसाठी दोन टेबल
पोस्टल बॅलेट मतमोजणी टेबल क्रमांक - एकसाठी जालन्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची तर टेबल क्रमांक दोनसाठी औरंगाबादचे अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांची नियुक्ती आहे. मोजणी पर्यवेक्षक म्हणून ५६ अधिकाऱ्यांची तर राखीव मोजणी पर्यवेक्षक म्हणून २४ अधिकारी नियुक्त आहेत. मोजणी सहायक म्हणून १६८ तर राखीव मोजणी सहायक म्हणून २२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मदतीसाठी ११ अधिकारी, कर्मचारी नियुक्त आहेत.

असा ठरेल कोटा
वैध मतांची बेरीज करून पहिल्या पसंतीच्या मतानुसार विजयी होण्यासाठी कोटा ठरेल. वैध मतांच्या संख्येला दोनने भागून त्यात एक अधिक केल्यानंतर जी संख्या येईल, ती संख्या विजयासाठी कोटा म्हणून निश्चित करण्यात येईल.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

Pune Bangalore Highway Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला! पुणे–बंगळूर महामार्गालगत पिकअप पलटी; 11 भाविक जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

ग्लेन फिलिप्स फक्त मैदानातच उडत नाही, तर आकाशात विमानही उडवतो; स्वत:च शेअर केला Video

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

SCROLL FOR NEXT