water scarcity of aurangabad sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : 'पाणीपुरवठा' सुरळीत करा, अन्यथा कारवाई

विभागीय आयुक्तांचा महापालिका अधिकाऱ्यांना इशारा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरातील पाणी टंचाईची दखल आता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली आहे. महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल, असा इशारा दिला. चार दिवसाआड समान पाणी नागरिकांना मिळाले पाहिजे, अशी तंबीही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

उन्हाळा सुरू झाल्यापासून नागरिक वारंवार आंदोलने करत आहेत. त्याची दखल घेत श्री. केंद्रेकर यांनी सोमवारी बैठक घेतली. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड, कार्यकारी अभियंता अजयसिंग, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी असलेले निवृत्त कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता किरण धांडे, के. एम. फालक, अशोक पद्मे, शहराच्या नव्या पाणी पुरवठा योजनेचे काम करणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीचे निर्णय अग्रवाल, पीएमसीचे समीर जोशी उपस्थित होते.

यावेळी श्री. केंद्रेकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जायकवाडी येथून शहरात किती पाणी येते, किती वितरण होते? वारंवार पाणी पुरवठा विस्कळीत का होतो? याची कारणे त्यांनी अधिकाऱ्यांना विचारली. ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे तातडीने संपूर्ण शहरात समान पाणी पुरवठा करावा, पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अवैध नळकनेक्शन शोध मोहीम राबवून ते तोडण्यात यावे.

ज्या भागात पाणी पुरवठा झाला नाही, त्या भागात टँकरने पाणी द्यावे, टाक्या भरल्याशिवाय नळाला पाणी सोडू नये, गळत्या बंद कराव्यात. अशा सूचना करत येत्या आठ दिवसाच्या आत पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल, असा इशारा केंद्रेकर यांनी दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अडचणी सांगा, मी सोडवितो

शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा श्री. केंद्रेकर यांनी घेतला. कामे गतीने करण्यासाठी कंत्राटदाराने पावले उचलावीत. भाववाढ मिळत नाही, म्हणून काम थांबता कामा नये. मुख्य पाइपलाइनच्या कामाला सुरुवात करा. जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून कामे करून घ्यावीत, ज्या अडचणी येत असतील त्या तातडीने सोडविण्यासाठी मी कधीही मदत करण्यास तयार आहे. कामाचा बार चार्ट तयार करून सादर करा, असे निर्देश केंद्रेकर यांनी बैठकीत दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT