Aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : खुलताबाद उरुसाला भाविकांची मांदियाळी

शहरातील हजरत बाबा बुऱ्हाणउद्दीन यांच्या दर्ग्यापासून संदलच्या मिरवणुक

सकाळ वृत्तसेवा

खुलताबाद : येथील हजरत जर जरी जर बक्ष यांच्या ७३६ व्या उरसाला मंगळवारी (ता.४) संदलच्या मिरवणुकीने सुरुवात झाली. यावेळी पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी येथे गर्दी केली होती.उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, उरुस व्यवस्था समिती अध्यक्ष तथा तहसीलदार सुरेंद्र देशमुख, दर्गाह कमिटी अध्यक्ष तथा उरुस व्यवस्था समिती उपाध्यक्ष मोहम्मद एजाज अहमद, सचिव तथा मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, दर्गाह कमिटी सदस्य शेख हबीदोद्दीन, आबेद हुसेन, शेख कामरानउद्दीन, युसुफोद्दीन चिरागोद्दीन, इम्रान जहागीरदार, मतीन जहागीर, मोहम्मद अबरार यांच्या उपस्थितीत खुलताबाद शहरातील हजरत बाबा बुऱ्हाणउद्दीन यांच्या दर्ग्यापासून संदल मिरवणूक काढण्या आली.

यानिमित्त उरुस मैदानात विविध दुकानांसह खाजाची दुकाने, विविध प्रकारचे राहटपाळणे थाटली असून कोरोनामुळे दोन वर्ष उरुस भरला नव्हता. मात्र, आता कोरोना नसल्याने मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटल्याने दोन वर्षात झालेले नुकसान भरून निघण्यास यंदा हातभार लागेल, अशी प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली. यानिमित्त हजरत ख्वाजा मुन्तजीबोद्दीन जर जरी जर बक्ष यांच्या दर्गाहवर रंगरंगोटी तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जिल्हा अधिकारी सुनील चव्हाण यांनी येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांचा आढावा घेतला.

तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलिस निरीक्षक, २८ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, २५० पोलिस कर्मचारी, ७० होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी ४७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : भारतात एस-४०० पेक्षाही अत्याधुनिक शस्त्रप्रणाली विकसित होणार...पंतप्रधान मोदींकडून ‘सुदर्शन चक्र मिशन’ची घोषणा

Narendra Modi on Trump Tariff: लाल किल्ल्यावरून ट्रम्पच्या टॅरिफला पंतप्रधान मोदींनी दिले उत्तर... 'मोदी दीवार बनकर खडा है'

Latest Marathi News Live Updates : सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्कल विपन्न सहायता समितीच्या परिसरात फडकावला तिरंगा

PM Modi's Independence Day 2025 Look: पांढरा कुर्ता अन् भगवा फेटा, स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या खास लूकचे फोटो आले समोर

Independence Selfie Tips: स्वातंत्र्यदिनाला घरी, ऑफिसमध्ये तिरंग्यासोबत सेल्फी घेताय? या स्पेशल टिप्समुळे तुमच्या सेल्फीवर होईल likes चा वर्षाव

SCROLL FOR NEXT