corona impact on hoteling
corona impact on hoteling 
छत्रपती संभाजीनगर

Corona Impact| हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचे मोडणार कंबरडे, कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

शेखलाल शेख

औरंगाबाद: मागील वर्षी लावलेले लॉकडाऊन आणि आता ब्रेक दी चेन यामुळे औरंगाबादेतील हॉटेल, रेस्टारंट मालक मोठ्या संकटात सापडले आहेत. आठ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पुन्हा अशा प्रकारची घोषणा केल्यामुळे व्यवसाय मृत्यूपंथाला टेकेल. लॉकडाऊनमुळे शहरातील जवळजवळ ५०० हॉटेल आणि १३०० रेस्टॉरंट व बारमध्ये काम करणारे लोक मोठ्याप्रमाणात बेरोजगार होतील आणि त्यातून होणाऱ्या आर्थिक नुकसानामुळे पूर्ण यंत्रणा दिवाळखोरीकडे ढकलली जाईल, असे भिती हॉटेल चालकांनी व्यक्त केली आहे.

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) आणि औरंगाबाद हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने इशारा दिला आहे की, या घडीला पूर्ण लॉकडाऊन केल्यामुळे या उद्योगाचे भरुन न येणारे नुकसान होईल. हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडून जाण्यापासून रोखायचा असेल तर सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, गरज असेल तर संख्येवर निर्बंध आणावेत. 

२० टक्के हॉटेल, रेस्टारंटला कुलूप 
लॉकडाऊन उठवल्यानंतरही ३० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट अजून खुली झालेली नाहीत; आर्थिक संकटामुळे २० टक्के तर पूर्णपणे बंद झालेली असून उघडलेली उर्वरित ५० टक्के या निर्बंधांमुळे पुन्हा बंद झाली आहेत. कोविड रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे हे नाकारता येणार नाही मात्र त्यासाठी केवळ आदरातिथ्य उद्योगाला जबाबदार धरणे अयोग्य आहे. किंबहुना हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सर्वप्रकारच्या खबरदारी पूर्णपणे घेतल्या जातात. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या उद्योगाने निवारा दिला आणि दररोज लाखो गरजूंना अन्नही पुरविण्यात आले. 

हॉटेल आणि रेस्टॉरंटचा परिसर नियंत्रित असून सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य व सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. तरीदेखील हॉटेल आणि रेस्टॉरंट कारवाईच्या विळख्यात आले आहेत. अशाप्रकारच्या निर्णयाचा उद्योगावर त्यात काम करणाऱ्या लोकांवर होणाऱ्या परिणामाचा प्रशासनाने विचार करावा. 
-हरप्रीत सिंग, औरंगाबाद हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे प्रवक्ते 

 

आम्ही सरकारला विश्वास देऊ इच्छितो की, आम्ही एक जबाबदार उद्योग आहोत आणि त्यामुळे हॉटेल व रेस्टॉरंटला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. 
-शेरी भाटिया, एचआरएडब्ल्यूआयचे अध्यक्ष 

(edited by- pramod sarawale) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

SCROLL FOR NEXT