RTE Admission News 
छत्रपती संभाजीनगर

आरटीई प्रवेशासाठीचा 'ड्रॉ' लवकरच, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची माहिती

सुनील इंगळे

औरंगाबाद : आरटीई प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत पालकांच्या पाल्यांची नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली असून, आता जिल्हास्तरावरील कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करता प्रवेशाचा ड्रॉ ६ एप्रिलरोजी काढण्याची शक्यता असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ करण्यात आला.

या कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. २०१९-२० या वर्षातील प्रवेश प्रक्रियेस लकी ड्रॉ देखील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन करण्यात आला होता. तर प्राथमिक शाळा उघडल्याच नाहीत. औरंगाबाद जिल्ह्यातील ६०३ शाळांमधील ३६२५ जागा आहेत. त्यासाठी ११ हजार ९०५ पालकांनी अर्ज निश्चित केले आहेत. तर १ हजार ३४२ पालकांनी अर्ज भरले परंतु त्यांची निश्चिती ऑनलाइन केलेली नाही. अशी माहिती आरटीई प्रवेश समन्वयक अधिकाऱ्यांनी दिली. तर यंदा देखील इंग्रजी माध्यमासह सीबीएसई पॅटर्नच्या शाळांनाच प्रवेशासाठी पालकांनी पसंती दर्शवली असून, नामांकित शाळांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले आहेत. दरम्यान ३० मार्च पर्यंत देण्यात आलेली अर्जाची मुदत आता संपली असून, प्रवेश निश्चितीसाठी पात्र ठरणाऱ्या पाल्यांची अंतिम यादीसाठीचा ड्रॉ ६ एप्रिल रोजी काढण्यात येण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT