ghati hospital 
छत्रपती संभाजीनगर

‘घाटी’च्या फोटोवरुन ट्रोलींगवॉर! व्हायरल फोटोमुळे टिकेचीही झोड

मनोज साखरे

औरंगाबाद: घाटीतील फोटो आता व्हायरल करुन नकारात्मकता पसरविली जात आहे. घाटीवरुन राजकीय ट्रोलिंग होत आहे. एकाच खाटेवर अनेकजण व जमिनीवर रुग्ण ऑक्सिजन घेतानाचे दोन फोटो व्हायरल झाले आहेत. यात पहिला फोटो घाटीचा असल्याचे स्पष्ट झाले. या फोटोवरुन सरकारविरोधी टिकेची झोड उठविली जात आहे. हे फोटो आता राजकीय धुराळ्यातही फिरविले जात आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हे फोटो ट्विट केले व ‘मंत्र्यांना वाचवण्यासाठी जेवढी धडपड सरकार करतेय तेवढे सर्वसामान्य जनतेचा जीव वाचविण्यासाठी केली तर त्यांचे जीव वाचतील. ‘औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमधील ही भयावह परिस्थिती’ असा मजकूर पोस्ट केला. या पोस्टवरुनही या नेत्यालाही ट्रोल केले गेले. 

असे हे ट्रोलिंग 
ट्विव्ट केलेल्या फोटोनंतर त्यावर खरमरीत टिकाही झाल्या. त्यात ‘विरोधी पक्षाने यावर टिका करण्यापेक्षा सरकारसोबत काम करावे ही वेळ महाराष्ट्रासाठी लढायची आहे एकमेकांत लढण्याची वेळ नाही. दुसरी प्रतिक्रीया ‘त्यांच्याकडे टिका करायचे खाते आहे. डॉक्टर त्यांची चोख भुमिका बजावत आहे. सरकारसोबत काम केल्यानंतर आमदारकी कशी मिळेल? त्यांना पीएम फंडाला मदत करा असे सांगा महाराष्ट्र सरकार खंबीर आहे संकटाशी लढायला.’ तिसरी प्रतिक्रीया अगदी वैयक्तीक असून त्यात ‘पतीला वाचविण्याची जेवढी तत्परता तेवढी पंतप्रधानांना भेटून कोरोना रुग्णांसाठी दाखवावी असेही ट्रोलींग करण्यात आले.

आधी उपचार मग सोपस्कार! 
रुग्ण घाटीत आल्यानंतर आधी त्याला रुग्णवाहिकेत ताटकाळत ठेवण्याऐवजी अपघात विभागात घेतले जात आहे. त्यामुळे या विभागात रुग्णांची संख्या वाढते. एक्स रे करणे, रुग्णाचा अर्ज भरणे या प्रक्रीया होईपर्यंत रुग्णांना बाहेर ताटकाळत ठेवणे योग्य नाही त्यामुळे त्याच्यावर आधी उपचार केले जातात व प्रक्रीया सोपस्कार दुसरीकडे केला जातो.

घाटी प्रशासन म्हणते... 
व्हायरल फोटोपैकी एक फोटो घाटीच्या अपघात विभागाचा आहे. रुग्ण येताच त्याला दाखल करुन घेत तपासणी केली जाते उपचार सुरु केले जातात व त्यानंतर रुग्णाला वार्डात पाठविले जाते. त्या दिवशी १०५ जण घाटीत भरती झाले. सायंकाळी खुप रुग्ण वाढले. अपघात विभागाची क्षमता १२ खाटांची आहे. २८ रुग्ण एकाचवेळी अपघात विभागात अचानक आले होते. सर्वांना ऑक्सिजनची आवश्‍यकता असल्याने एका खाटेवर दोन-दोन रुग्ण घ्यावे लागले. दुपारी एकदम रुग्ण बाहेरुन आले होते. तपासणी व तातडीचे उपचारामुळे त्यांना वार्डात पाठविण्यासाठी वेळ लागतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं 19 हजार तर चांदी 98 हजारांनी स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

Pakistan Cricket : पाकिस्तानचा गोंधळ! T20 World Cup बद्दल केलेला मेसेज डिलिट... आता यांचा काय नवीन ड्रामा? चाहते संतापले

Latest Marathi News Live Update : सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीला

Sanjay Raut statement : सुनेत्रा पवार यांच्या शपविधीवर संजय राऊत म्हणाले, 'शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य योग्यच'

Budget 2026 : 1973 सालच्या बजेटला 'ब्लॅक बजेट' का म्हटलं जात? देशावर नेमकं काय संकट आलं होतं?

SCROLL FOR NEXT