छत्रपती संभाजीनगर

'कोरोनाबाधितांना योग्य उपचारांसह सुविधा उपलब्ध करुन द्या'

रूग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, वैद्यकीय उपचार, त्यांचे जेवण, स्वच्छता, सुरक्षा आदीबाबत आढावा घेतला. तसेच प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबत शहानिशा केली व या सुविधाबाबत समाधान व्यक्त केले.

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : ग्रामीण भागात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पाचोडसह (ता.पैठण) (Paithan) परिसरात बाधितांचे प्रमाण अधिक आहे. त्यातच दिवसेंदिवस नव्या बाधितांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजना करून बाधितांना उपचारासह सुविधा देण्यासाठी प्राधान्य द्या. जास्तीत-जास्त लसीकरणाचा (Corona Vaccination) गती वाढवा. वाढत्या रुग्णसंख्येसाठी पर्यायी जागा ताब्यात घेऊन उपचार सुविधा उपलब्ध करून द्या, अशा सूचना पैठण-फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी डॉ.स्वप्निल मोरे यांनी गुरूवारी (ता.१३) केल्या.पाचोड येथे कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामीण रुग्णालयास दिलेल्या भेटी दरम्यान उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना देताना उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्निल मोरे बोलत होते. (Aurangabad Latest News Let Be Available Facilities To Covid Patients Paithan)

यावेळी पैठणचे तहसिलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी इंदेल बहुरे, परिसरातील तलाठी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ.मोरे व तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी कोविड सेंटरवर बाधित रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांसंबधी माहिती जाणून घेत. या ठिकाणी येणाऱ्या रूग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, वैद्यकीय उपचार, त्यांचे जेवण, स्वच्छता, सुरक्षा आदीबाबत आढावा घेतला. तसेच प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबत शहानिशा केली व या सुविधाबाबत समाधान व्यक्त केले. याशिवाय अपुऱ्या पडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्या पाहून तीन महिन्याच्या खासगी तत्त्वावर तात्काळ जागा भरुन अहवाल पाठवावा. तसेच कोरानाचे उपचार सुरू असताना इतर आजाराच्या रुग्णांना नियमित वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होतील. यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून रुग्णांना उपचार उपलब्ध करून द्यावेत. 'पॉझीटिव्ह' रुग्ण आढळल्यास तयार केलेल्या कंटेनमेंट झोनमधून कोणताही व्यक्ती बाहेर पडणार नाही किंवा बाहेरील व्यक्ती कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश करणार नाही. याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या. यावेळी यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजुनाना भुमरे, सरपंच शिवराज भुमरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुधीर पोहरेगावकर, उपसरपंच शिवाजी भालसिंगे, जीजा भुमरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.साकेब सौदागर, डॉ.रोहित जैन, डाॅ. इफ्फत सौदागर, आरोग्य सेवक सरफराज सय्यद आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

अग्रलेख : डिजिटल अरेस्ट

AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT