Takali Kolte Sub Health Centre Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

आरोग्य सेवेसाठी 'प्रहार'तर्फे चपलांचा हार घालून ठिय्या आंदोलन, लोकार्पण होऊनही प्रतिक्षा संपेना!

बाबासाहेब ठोंबरे

पीरबावडा (जि.औरंगाबाद) : टाकळी कोलते (ता.फुलंब्री) येथील आरोग्य उपकेंद्र सुरु करण्यात यावे, यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने आज गुरुवारी (ता.एक) ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम या आरोग्य उपकेंद्राला चपलांचा हार घालून हे आंदोलन चालू करण्यात आले. या उपकेंद्राचे बांधकाम मागील पाच सहा वर्षांपासून सुरू होते. गेल्या चार महिन्यांपूर्वी हे काम पूर्ण होऊन खासदार, आमदार यासह इतर लोकप्रतिनिधींच्या हस्ते या उपकेंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला.

मात्र हे उद्घाटन होऊन चार महिने उलटले तरी या केंद्रात कुणीही कर्मचारी नियुक्त नसून ग्रामस्थांना कोणत्याच प्रकारच्या आरोग्य सेवा मिळत नसल्याने मागील पंधरा दिवसांपासून हे उपकेंद्र चालू करावे. येथील कर्मचाऱ्यांच्या जागा भरून ग्रामस्थांना आरोग्य सेवा गावातच देण्यात याव्या. या मागणीसाठी तहसीलदार,आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी आदी कार्यालयाला निवेदने देण्यात आली आहे. मात्र अजून सुद्धा कार्यवाही झाली नसल्याने हे आंदोलन सुरू केल्याचे प्रहारचे राहुल काकडे यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, पकोडे आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार, बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध; कृषी राज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

Latest Marathi News Live Update : संगमनेरमध्ये शेअर मार्केटच्या नावाने 62 जणांची फसवणूक

SCROLL FOR NEXT