murama accident 
छत्रपती संभाजीनगर

मुरमा शिवारात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

हबीबखान पठाण

पाचोड (औरंगाबाद): खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा अचानक पाय घसरल्याने खदानीतील पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना मुरमा (ता.पैठण) शिवारात गुरूवारी ( ता.२५ )रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

यासंबंधी अधिक माहिती अशी, मुरमा (ता. पैठण) येथील मीराबाई गणपत चिडे (वय ४० वर्षे) ही महिला गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घरगुती कामे आटोपून मुरमा शिवारातील गट नंबर १४८ मधील खदानीत कपडे धुण्यासाठी गेली होती. कपडे धुताना पाय घसरून ती पाण्यात पडून पोहता येत नसल्याने बुडून मरण पावली. मीराबाई कपडे धुण्यासाठी जावून दोन तास झाले तरी ती घरी न परतल्याने कुटुंबातील काही सदस्य उशीर झाल्याने खदानीवर गेले असता तेथे त्यांना धुण्यासाठी घेवून गेलेले कपडे दिसून आले.

मिराबाईच्या नावाने आवाज दिला मात्र कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने पाण्यात व इतरत्र तिचा शोध घेतला. परंतु मिराबाई कोठेच दिसून येत नसल्याने ती बहुतांश त्यांना खदानीच्या पाण्यात पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यावेळी ग्रामस्थ जिब्राईल पटेल, कृष्णा मंडलिक, इस्माईल शेख यांनी पाण्यात बुड्या घेऊन सर्वत्र शोध घेतला. तब्बल दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर तळाला कपारीत अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आले. या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना देण्यात आली. ही माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे, पोलिस जमादार किशोर शिंदे, फेरोझ बरडे, हनुमान धनवे यांनी घटनास्थळी धाव घेवून घटना स्थळाचा पंचनामा केला.

पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात आणला. वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुधीर पोहरेगावकर यानी त्यांस तपासून मृत घोषित केले, तर वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा खरात यांनी उत्तरणीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणुन नोंद करण्यात आली असून पुढील तपास पाचोड पोलिस करत आहे.

मृत महिलेची मुलगी काही दिवसांपूर्वी माहेरी मुरमा येथे प्रसुतीसाठी आली होती, ती दोन दिवसापूर्वी प्रसुती झाल्याने तिच्यासह बाळाचे कपडे बाहेरच धूवावे या उद्देशाने ती खदानीवर गेली अन त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे गावासह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून सायंकाळी शोकाकुल वातावणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने झाले महाग, चांदीतही २१०० रुपयांची वाढ; तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या

Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्ग १० तास ठप्प; मंचरमधील आंदोलनाचा फटका; वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल..

Latest Marathi News Live Update : अमेरिकेत ७००० ड्रायव्हर्सवर बंदी, भारतावर परिणाम

Kolhapur Kalamba Jail : कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये सापडली जिवंत काडतूसे, पुण्यातील आंदेकर टोळी कनेक्शन? सुरक्षा यंत्रणांना दिला चकवा

Pune School Controversy: शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे कापले केस; स्वतंत्र शुल्क आकारल्याची माहिती

SCROLL FOR NEXT