Born Baby e sakal
छत्रपती संभाजीनगर

वीस हजार बालकांच्या नोंदीच नाहीत

माधव इतबारे

आगामी दीड महिन्यात या नोंदी अपडेट करण्याच्या सूचना सर्व वॉर्ड कार्यालयांना देण्यात आल्या असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

औरंगाबाद : नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ऑनलाईन कारभारावर भर दिला जात असला तरी महापालिकेत Aurangabad Municipal Corporation मात्र अद्याप फाईल फाईलचा खेळ सुरू आहे. शहरातील विविध प्रसुतीगृहात जन्मलेल्या Birth Registration बालकांची नोंदी ऑनलाईनवर अपडेट करणे गरजेचे आहे. पण २०१६ पासून आतापर्यंत सुमारे २० हजार बालकांच्या नोंदी अपडेट Newborn Birth Registration झालेल्‍या नाहीत. अशी स्थिती मृत्यू झालेल्या नागरिकांच्या बाबत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा अहवाल मागील चार वर्षांपासून ऑनलाईन अपडेट केल्या गेला नाहीत. त्यामुळे नागरिकांना जन्म आणि मृत्युचा दाखला जरी मिळाला असला तरी शासन दरबारी त्याची नोंद बाकी आहे. त्यामुळे आगामी दीड महिन्यात या नोंदी अपडेट करण्याच्या सूचना सर्व वॉर्ड कार्यालयांना देण्यात आल्या असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. शहरात जन्मलेल्या बालकांच्या व मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नोंदी महापालिकेकडे असतात. त्याच्या आधारावर जन्म-मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते. महापालिकेने लेखी नोंदीनुसार जन्म-मृत्यू प्रमाणपत्र दिले आहेत. पण त्यांच्या नोंदी शासनाच्या वेबासईटवर अद्याप झालेल्या नाहीत. गेल्या चार वर्षांत किमान २० हजार नवजात बालकांच्या नोंदी अपडेट नाहीत. तसेच मृत्यु झालेल्या हजारो नागरिकांची देखील ऑनलाईन नोंद करणे आवश्यक आहे. या विषयी डॉ. मंडलेचा यांनी वॉर्ड अधिकाऱ्यांची बैठक घेत दीड महिन्यात संपूर्ण नोंदी अपडेट करण्याच्या सूचना केल्या आहेत.aurangabad live news 20 thousand new born children birth registration not updated

कुठे कर्मचारी नाही

नोंदी अपडेट करण्यासाठी अनेक अडचणी असल्याचा पाढा वॉर्ड अधिकाऱ्यांनी वाचला. आमच्याकडे संगणक नाही, डाटा ऑपरेटर नाही, असे अनेकांचे म्हणणे होते. त्यानुसार संगणक व कर्मचारी दिले जात आहेत, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

नर्सिंग होमला देणार सॉफ्टवेअर

शहरातील ५०० अधिकृत नर्सिंग होमला जन्माची नोंद करण्यासाठी सॉफ्टवेअर देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याचा पाच तारेखेपर्यंत हा डाटा अपडेट होईल. त्यानंतर जन्माचा दाखला वॉर्ड कार्यालयात अधिकाऱ्यांच्या डिजिटल सहीसह तयार राहील. त्यामुळे जन्माचा दाखला काढण्यासाठी नागरिकांना चकरा माराव्या लागणार नाही, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! आता दररोज मुंबईहून कोकणात रेल्वे धावणार, प्रशासनाची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

Commonwealth Games 2026: अपघातात पाय गमावला, बॉक्सरचा गोळाफेकपटू झाला... सोनम राणाने ऐतिहासिक सुवर्ण जिंकले; दोन रौप्यपदकही खात्यात आले

'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये रोमँटिक ट्विस्ट; समर-स्वानंदीची हटके डेट, मालिकेत स्वप्नील जोशीची एन्ट्री होणार

Latest Marathi News Live Update : खासदार पप्पू यादव यांच्या विरोधात भाजपाचे नागपुरात आंदोलन

Paithan Dog Menace: पाचोड परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; सात महिन्यांत ७३२ नागरिकांना श्वानदंश, प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप

SCROLL FOR NEXT