उद्योजक सुनील नवले उद्योजक सुनील नवले
छत्रपती संभाजीनगर

उद्योजक सुनील नवले यांचे निधन, महिनाभरात कुटूंबातील चौघांचा मृत्यू

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ. संजय माणिकराव नवले यांचे १५ एप्रिलला कोरोनाने निधन झाले होते.

- अतुल पाटील

औरंगाबाद : चोराखळी (ता. कळंब) येथील नवले कुटुंबावर नियतीने क्रूर घाला घातला आहे. महिन्याभरात एकाच कुटुंबातील चौघांचे निधन झाले आहे. आई, वडील आणि भाऊ गमावल्यानंतर उद्योजक सुनिल नवले (Industrialist Sunil Nawale) यांचे रविवारी (ता.नऊ) सकाळी साडेदहा वाजता पुणे येथे निधन झाले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (Babasaheb Ambedkar Marathwada University) हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ. संजय माणिकराव नवले (Professor Sanjay Nawale) यांचे १५ एप्रिलला कोरोनाने (Corona) निधन झाले होते. या घटनेचा धक्का बसल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच माणिकराव नवले (वय ८०) मंदाकिनी नवले (वय ७८) यांनी २३ एप्रिलला सायकांळी दोन तासाच्या अंतराने प्राण सोडला. (Aurangabad Live Updates Industrialist Sunil Nawale Dies In Pune)

दरम्यान, डॉ. नवले यांचे बंधू सुनील नवले (वय ५१) यांनाही धक्का बसल्याने पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कोरोनाची लागण झाली. रविवारी (ता. नऊ) सकाळी त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात भाऊ प्रा. अरविंद नवले (उदगीर), पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पुणेस्थित हनीवेल कंपनीत बिझनेस हेड या पदावर ते कार्यरत होते. चोराखळी गावावर या घटनेने शोककळा पसरली आहे. शुन्यातून विश्व उभा करणाऱ्या चौघांचा २५ दिवसाच्या आत मृत्यु झाला आहे. डॉ. नवले कुटुंबियांच्या दु:खात विद्यापीठातील सर्वजण सहभागी आहोत, असे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT