Aurangabad crime news esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

लासूर स्टेशनच्या महावीरनगरातील घटना : चोरट्यांचे पोलिसांना आव्हान

सकाळ वृत्तसेवा

लासूर स्टेशन : लासूर स्टेशन (ता.गंगापूर) येथील महावीर नगरातील एका घराचे कुलूप तोडून मंगळवारी (ता.४) भरदिवसा दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १लाख ६१ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

शिल्लेगाव पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी प्रा.अशोक म्हस्के यांच्या घरी चोरी झाली. दुपारी बारा वाजेचे दरम्यान लासूरगाव रस्त्यावर असणाऱ्या महावीरनगर परिसरातील प्रा.म्हस्के हे घर बंद कुटुंबीयांसह बाहेर गेले होते. त्याचवेळी चोरट्यांनी डाव साधला. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील नगदी आणि सोने, चांदीचे दागिने असा एकूण १,६१,९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याबाबत माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन श्वान पथक, ठसे तज्ञांना पाचारण केले. मात्र, चोरट्यांचा शोध लागला नाही. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासून शोध घेणे सुरु केले असून शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्लेगावचे पोलिस निरिक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शेख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Marathwada Vidarbha : बंडखोर खासदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे शड्डू ठोकणार; मराठवाडा ते विदर्भ दौरा ठरला

Germany vs Ivory Coast: दोन गोल अपात्र ठरवले, तरी जर्मन्स नाही खचले; भरपाई वेळेत आयव्हरी कोस्टावर रोमहर्षक विजय

Maharashtra Politics: अमित शहांचं भाषण सुरू असताना पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल, एक फोन अन्‌ शिंदे ताडकन उठले

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

SCROLL FOR NEXT