Drug suicide sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : बाजार समितीसमोर भावजय-दिराची आत्महत्या

रमाड पोलिसांनी तात्काळ १०२ नंबर वर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली पण...

सकाळ वृत्तसेवा

करमाड : कृषी उत्पन्न बाजार समिती इमारतीसमोर जालना रोडवर राळ हिवरा (ता. बदनापूर, जि. जालना) येथील काकासाहेब बबन कदम (३२) तर सत्यभामा अशोक कदम (२७) या चुलत दीर-भावजयीने संध्याकाळी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. करमाड पोलिसांनी तात्काळ १०२ नंबर वर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली व त्यांना उपचारासाठी चिकलठाणा येथील मिनी घाटीत पाठवण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

जालना जिल्ह्यातील महिला व तिची बहीण बेपत्ता असल्याची नोंद करमाड पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती. यात सत्यभामा कदम या गोलटगाव येथील आपल्या बहिणीकडे मुलाच्या वाढदिवसासाठी आल्या होत्या व तेव्हापासून आपल्या बहिणीसह फरार झाल्या होत्या.

त्यांच्या बहिणीचा शोध लावण्यात करमाड पोलिसांना दोन दिवसांपूर्वी यश आले होते. तेव्हापासून करमाड पोलीस सत्यभामा यांच्या शोधात होते. सत्यभामा कदम व चुलत दीर काकासाहेब कदम यांनी करमाड येथे विषारी द्रव्य प्राशन केले. ते नागरिकांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी बघ्यांची एकच गर्दी झाली. या दोघांना उलट्या झाल्यानंतर त्यांना झटके यायला लागले. नागरिकांनी करमाड पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली.

करमाड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयसिंग जारवाल हे तात्काळ ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झाले. या दोघांना चिकलठाणा येथील मिनी घाटीमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पुढील तपास बीट जमादार संतोष पाटील व पोना विजयसिंग जारवाल करत आहे. दरम्यान, ही घटना प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT