MLA Sanjay Shirsat esakal
छत्रपती संभाजीनगर

Sanjay Shirsat : शिरसाटांकडून ठाकरेंचा जुना व्हिडिओ ट्विट; शिंदे गटात नाराजी?

बंडखोरी करून भाजपसोबत एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केलेल्या शिंदे गटात मंत्रीपदावरून नाराजी नाट्य सुरु झाल्याचं चित्र आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Political Update : बंडखोरी करून भाजपसोबत एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केलेल्या शिंदे गटात मंत्रीपदावरून नाराजी नाट्य सुरु झाल्याचं चित्र आहे. कारण शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये 'उद्धव ठाकरे' यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, शिरसाट यांनी टि्वट सोबत विधानसभेतील उद्धव ठाकरेंचे एक भाषण देखील जोडलं होते. मात्र, काही वेळाने त्यांनी हे ट्वीट डिलिट केले.

बंडानंतर शिरसाठ शिंदे गटात सर्वात पहिले सहभागी झाले होते असे असतानाही त्यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या या व्हिडिओनंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना इशारा तर दिला नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काही वेळातच शिरसाट यांनी हे ट्वीट डिलीट देखील केले आहे. जुन्या व्हिडिओचे ट्वीट डिलिट केल्यानंतर शिरसाटांनी आणखी एक ट्वीट करत काही गोष्टी नमुद केल्या आहेत.

आमची भूमिका उद्धव ठाकरेंच्या विरोधात नव्हती. आमची भूमिका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात होती. विचार पटत नव्हते म्हणून आम्ही विभक्त झालो. याचा अर्थ नातं तोडलेले नाही. आम्ही आजही शिवसेना आहोत. जो आमचा नेता असतो तो आमचा कुटुंबप्रमुख असतो. बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब आमचे कुटुंबप्रमुख असून, आम्ही उद्धव ठाकरे यांना नेहमीच कुटुंबप्रमुख मानत आलो आहोत. त्यांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नव्हती.

मंत्रिपदाचा पत्ता कट झाल्यानंतर संजय शिरसाट शुक्रवारी पहिल्यांदा औरंगाबादमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी आपल्याला मंत्रीपद मिळेल कारण अद्याप विस्तार पूर्णपणे झालेला नाही. एकनाथ शिंदेंवर मला विश्वास असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT