air-india Aurangabad-Mumbai Air India Plane Return
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद-मुंबई एअर इंडिया विमान परतले, शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस

अनिल जमधडे

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी (ता.एक) दुपारी साडेतीन वाजता ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाला. दुपारी साडेतीन वाजता मुंबईहून औरंगाबादला (Aurangabad) येणारे एअर इंडियाचे (Air India) विमान उतरु शकले नाही. हे विमान पुन्हा मुंबईला परत गेल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. शहरात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी दोन वाजेपासून आभाळ भरुन आले. त्यानंतर साधारण साडेतीन वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजेच्या काडाकाटासह धुवाँधार पाऊस कोसळला. अर्धा ते पाऊण तास ढगफुटी सदृश्य पाऊस (Rain) झाला. पाऊस इतका जोरदार होता की काही वेळातच संपूर्ण रस्ते जलमय झाले होते.

या पावसामुळे औरंगाबादला सुरु झाला. या आधार पावसामुळे मुंबई-औरंगाबाद हे एअर इंडियाचे विमान उतरु शकले नाही. विमान अर्धातास आकाशात घिरट्या घालत होते. पाऊस कमी होत नसल्यामुळे वाट पाहून हे विमान पुन्हा परत मुंबईला वळविण्यात आले, असे असले तरीही हेच विमान सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान परत मुंबईहून औरंगाबादला आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT