Aurangabad muncipal Aurangabad
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत कोरोनाकाळातही महापालिका कर्मचारी पगारीविना

सलग तिसऱ्या महिन्यात लांबले वेतन

माधव इतबारे

औरंगाबाद: ऐन कोरोनाकाळात महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यापासून लांबणीवर पडत आहे. शासनाकडून मिळणाऱ्या जीएसटीच्या अनुदानावर कर्मचाऱ्यांचे वेतन केले जाते. पण अनुदानच विलंबाने येत असल्याने महिन्याच्या मार्च महिन्यापासून शेवटच्या आठवड्यात वेतन मिळत आहे. मार्च महिन्यात विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे अनुदान लांबणीवर पडले. त्यानंतर एप्रिलचे अनुदानही विलंबाने आले आता मे महिन्यातील २० तारीख उजाडली तरी अनुदान प्राप्त झालेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले आहे.

महापालिकेचे अर्थकारण सध्या जीएसटी अनुदानावर सुरू आहे. शासनाकडून जीएसटीचे अनुदान मिळण्यास विलंब झाल्यास महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इतर कामेही ठप्प होत आहेत. जीएसटीपोटी महापालिकेला प्रत्येक महिन्यात पाच ते सात तारखेदरम्यान २३.८५ कोटी रुपये अनुदान मिळते. पण गेल्या तीन महिन्यांपासून अनुदान वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च कसा भागवावा, असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे.

मे महिन्याची १९ तारीख उजाडली तरी एप्रिल महिन्याचे जीएसटी अनुदान शासनाकडून प्राप्त झालेले नाही, म्हणून कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नसल्याचे मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी सांगितले. महापालिकेच्या तिजोरीत गेल्या दीड महिन्यात मालमत्ता कर आणि पाणीपट्टीतून सुमारे १६ कोटींचा महसूल जमा झाला आहे. यातून इतर देणी देण्यात आली, असे संजय पवार यांनी नमूद केले.

महापालिकेचा अत्यावश्‍यक प्रमुख खर्च

  • कर्मचाऱ्यांचे वेतन - १५ कोटी

  • आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांचे वेतन- २ कोटी

  • वीज बिल- तीन कोटी ४० लाख

  • पाणी बिल- चार कोटी २५ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT