छत्रपती संभाजीनगर

भावी नगरसेवक म्हणताहेत काळजी करू नका, सावध राहा 

शेखलाल शेख

औरंगाबाद : वॉर्डाची रचना, आरक्षण झाल्यापासून इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. कित्येकांनी डोअर टू डोअर गाठीभेटीची एक-दोन फेऱ्यासुद्धा पूर्ण केल्या आहेत. आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भावी नगरसेवकांच्या कार्यक्रमांना काहीसा ब्रेक लागलेला असला तरी इच्छुकांनी कोरोनाची संधी साधत आपल्या वॉर्डात कोरोनाच्या जनजागृतीसाठी सर्वत्र होर्डिंग्ज लावले आहेत.

काय काळजी घ्यावी, सुरक्षित राहण्यासाठी काय करावे, याची पत्रके वाटणेही काहींनी सुरू केले आहे. काही जणांनी सोशल मीडियावरून आपल्या वॉर्डातील मतदारांना माहिती देण्यास सुरवात केली आहे.

सध्या बहुतांश वॉर्डांत प्रमुख पक्षांकडून डझनभर इच्छुक उमेदवार आहेत. सर्वसाधारण वॉर्डात तर याची संख्या वीसच्या पुढे आहे. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची संख्या लक्षणीय असताना त्यांच्या स्पर्धासुद्धा तीव्र आहेत. आपल्याला तिकीट मिळो अथवा न मिळतो मैदानात उतरणार असा चंग अनेकांनी बांधला असून, डोअर टू डोअर प्रचार केला जात आहे.

काही जणांनी आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहे हेसुद्धा सांगितले आहे. त्याची पत्रकेसुद्धा वाटली आहेत. सध्या सर्वत्र कोरोनाची चर्चा असताना आता भावी नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डात कोरोनाच्या जागृतीसाठी बॅनर लावले आहेत. या बॅनवर ‘काळजी करू नका सावध राहा, साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा, शिंकताना आपल्या नाकावर, तोंडावर रुमाल धरा. सर्दी, ताप असलेल्यांनी डॉक्टरांशी संपर्क करावा’, अशा सूचना लिहिल्या आहे.

सध्या भावी नगरसेवकांकडून त्यांच्या वॉर्डातील रहिवाशांना चांगली माहिती मिळत आहे. शिवाय यामध्ये नागरिकांनी राष्ट्रीय कॉल सेंटर, राज्यनियंत्रण कक्ष, टोल फ्री हेल्पलाइन यांच्याशी संपर्क करण्यासाठी नंबरसुद्धा दिलेले आहेत.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT