Aurangabad news
Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

चंद्रकांत पाटील यांची मोठी कबुली, युती असती तरी आम्ही वेगळेच लढणार होतो

प्रकाश बनकर

औरंगाबाद : राज्यात नियमित सरकार आले असते तर युती असतानाही शिवसेनेसोबत ही निवडणूक शेवटची निवडणूक म्हणून लढवणार होतो. स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका ग्रामपंचायती वेगवेगळ्या लढायच्या असे ठरले होते, अशी मोठी कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 

औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला संधी द्या. शहराचे चित्र बदलून दाखवतो, असेही ते म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहराच्या दौऱ्यावर असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (ता.२९) शहरातील नागरिकांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या.

2024 ची निवडणुक वेगळी लढवली पाहिजे, असे आमचे अघोषित अंडरस्टँडिंग होते. मात्र आता वेगळे झाल्यामुळे हा प्रश्नच राहिला नाही, यामुळे ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढवावी, असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षाही यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

स्थगिती सरकारने पर्यायी योजना कराव्यात

हे सरकार स्थगिती सरकार आहे स्थगिती द्या, पण काहीतरी पर्याय काढा. मराठा समाजासाठी सारथी संस्था आम्ही उभी केली आहे. यामुळे अनेक मुलांना फेलोशिप मिळाली. सारथीला विरोध करताय, मग पार्टी काढा. मराठवाडा वॉटर ग्रीडला विरोध करताय, तर मराठवाडा फ्रीड करा असा टोलाही महाविकास आघाडी सरकारला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

मित्र पक्ष लढणार भाजप चिन्हावर

विधानसभेचे प्रमाणे महापालिका निवडणुकीत भाजप सोबत असलेले आरपीआय व शिवसंग्राम उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे? अमित शाह काय म्हणाले जाणून घ्या...

IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT