Covid Vaccine
Covid Vaccine 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद महापालिकेकडे फक्त ५५० कोरोना प्रतिबंधक लसी शिल्लक!

माधव इतबारे

शासनाने १८ वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केल्यानंतर शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत होता. गेल्या आठवड्यात एक लाख १५ हजार नागरिकांनी लस घेतली आहे.

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लस Corona Vaccine घेण्यासाठी शहरातील नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असताना आता लसीच्या तुटवड्याचे संकट समोर आले आहे. रविवारी (ता. २७) महापालिकेला Aurangabad Municipal Corporation १२ हजार लस मिळाल्या होत्या, तर शनिवारी (ता. २६) सुमारे दोन हजार लसी शिल्लक होत्या. त्यातून सोमवारी (ता. २८) १५ हजार ३९६ जणांना लस देण्यात आली. आता महापालिकेकडे केवळ ५५० लस शिल्लक आहेत. त्यामुळे मंगळवारच्या (ता. २९) लसीकरणाबाबत अनिश्‍चितता आहे. आज फक्त प्रोझोन मॉल Prozone Mall येथील सेंटरवर कोविशिल्ड लस Covishield मिळणार आहे. शासनाने १८ वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केल्यानंतर शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत होता. गेल्या आठवड्यात एक लाख १५ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. आत्तापर्यंत शहरात ९६ हजार नागरिकांनी कोरोना Corona लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. तर तीन लाख ४२ हजार नागरिकांनी एक डोस पूर्ण केला आहे. मात्र लसींचा साठा मिळत नसल्यामुळे लसीकरणाची मोहीम आता अडचणीत आली आहे. महापालिकेला रविवारी रात्री १२ हजार लस मिळाल्या होत्या. त्यातून व शिल्लक लसींतून सोमवारी १५ हजार ३९६ जणांना लस देण्यात आली. आता महापालिकेकडे फक्त ५५० लसी शिल्लक आहेत. त्यामुळे फक्त प्रोझोन मॉल येथील केंद्रावर लस मिळेल. तसेच क्रांती चौक आरोग्य केंद्र, राज नगर आरोग्य केंद्र आणि अंबिका नगर आरोग्य केंद्रा अंतर्गत एन-४ येथील एमआयटी हॉस्पिटलमध्ये कोवॅक्सीन लसीचा दुसरा डोस उपलब्ध असेल असे महापालिकेकडून सांगण्यात आले.aurangabad municipal corporation have only 550 corona vaccines

महापालिकेकडे फक्त ५५० कोविशिल्ड लसी शिल्लक आहेत. लसींचा साठा केव्हा मिळेल, याविषयी अनिश्‍चितता आहे. त्यामुळे मंगळवारी फक्त प्रोझोन मॉल येथील केंद्रावर लस उपलब्ध असेल. वाहनातून आलेल्या व पायी येणाऱ्या नागरिकांना लस दिली जाईल.

- डॉ. निता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT