AstikKumar Pandey
AstikKumar Pandey 
छत्रपती संभाजीनगर

कार्यालयात हजर होत थेट प्रशासक फाईल मागतात तेव्हा...

माधव इतबारे

औरंगाबाद ः लॉकडाउनमुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. लॉकडाउन शिथिल होताच प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मालमत्ता कराच्या वसुलीची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी त्यांनी अचानक वॉर्ड कार्यालयांना भेटी दिली व वसुलीचे रेकॉर्ड आणा असे फर्मान त्यांनी कर्मचाऱ्यांना सोडले. त्यामुळे अनेकांची भंबेरी उडाली. अद्याप मागणीपत्र मालमत्ताधारकांना दिलेले नसल्याचे समोर येताच संतप्त झालेल्या प्रशासकांनी एकाला निलंबित करण्याचे, तीनजणांचे वेतन थांबविण्याचे, तर सातजणांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्याचे आदेश दिले. 

मालमत्ता करवसुलीची मोहीम १५ ऑगस्टनंतर हाती घेण्याचा निर्णय श्री. पांडेय यांनी घेतला आहे. बुधवारी त्यांनी सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत अधिकाऱ्यांना सोबत घेत प्रभाग तीन ते सात अशा पाच कार्यालयांना भेटी देत वसुली कर्मचाऱ्यांची झडती घेतली. यावेळी वसुलीच्या रेकॉर्डची मागणी त्यांनी कर्मचाऱ्यांकडे केली. अचानक आणि तेही प्रशासक समोर थांबून रेकॉर्ड मागत असल्याने कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अनेकांना माहितीही देता आली नाही. काहींजवळ डिमांड नोट तशाच पडून होत्या. त्यामुळे श्री. पांडेय संतप्त झाले. ऑगस्ट आला तरी डिमांड नोट मालमत्ताधराकांना पोचल्या नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करीत सातजणांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्याचे आदेश दिले; तसेच तीनजणांचे वेतन थांबविण्याचे आदेश दिले. जोपर्यंत त्यांच्या कामात सुधारणा होत नाही तोपर्यंत, वेतन देऊ नका, असे श्री. पांडेय यांनी नमूद केले. 

हलगर्जीपणा खपवून घेणार नाही 
आढावा घेताना विजय दाभाडे यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत त्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. वसुलीच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी ताकीद प्रशासकांनी यावेळी दिली. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, नंदकिशोर भोंबे उपस्थित होते. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वॉर्ड कार्यालयांमध्ये कर्मचारी-अधिकाऱ्यांना सोयीसुविधा आहेत का? याची पाहणी करण्यासाठी बुधवारी प्रशासकांनी अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी वसुलीचा आढावा देखील घेतला. ज्यांचे काम समाधानकारक नाही, त्यांना नोटिसा बजाविण्याचे व काहींचे वेतन थांबविण्याचे आदेश दिले. 
नंदकिशोर भोंबे, कर निर्धारक व संकलक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT